आशिष येरेकर झेडपीचे नवे सीईओ

आशिष येरेकर झेडपीचे नवे सीईओ

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी आशिष येरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येरेकर सध्या गडचिरोली जिल्ह्यात अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. ते 2018 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

गेल्या दोन महिन्यांपासून अहमदनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी पदाचा पदभार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांच्याकडे होता. सध्या प्रशासक म्हणूनही तेच कामकाज पाहत आहेत. दोन महिन्यांपूर्वी म्हणजे 10 मार्चला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांची मुंबईला मंत्रालयात राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्त यांच्या कार्यालयात सहसचिव म्हणून बदली झाली होती.

त्यानंतर प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी संभाजी लांगोरे यांच्याकडे सूत्रे देण्यात आली. दरम्यान, 20 मार्चला जिल्हा परिषद पदाधिकार्‍यांची मुदत संपल्याने प्रशासक म्हणूनही लांगोरे हेच कामकाज पाहत होते. साधारण दोन महिने त्यांनी उत्कृष्ट कार्यभार सांभाळला. दरम्यान, गुरुवारी शासनाने काही आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या. त्यात अहमदनगरच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी आशिष येरेकर यांची नियुक्ती करण्यात आली.

Related Stories

No stories found.