जलवाहिनी फुटल्याने उपनगरात निर्जळी

जलवाहिनी फुटल्याने उपनगरात निर्जळी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शुक्रवारी (दि. 17) रात्री 11 वाजता शहर पाणी पुरवठा योजनेची जुनी मुख्य जलवाहिनी फुटल्याने उपनगराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. शहर पाणी पुरवठा योजनेची जुनी मुख्य जलवाहिनी नांदगाव शिवारात पुंड वस्ती समोरील ठिकाणी पाण्याच्या व हवेच्या दाबाने तडा जाऊन फुटली.

याची माहिती मिळताच मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने सदर जलवाहिनी दुरूस्तीचे काम तातडीने हाती घेतले आहे. परंतु दुरूस्तीस अवधी लागणार असल्याने आज सकाळी नियोजित पाणी वाटपाच्या बोल्हेगाव, नागापूर, केडगाव, पाईपलाईन रोड परिसर आदी भागात पाणी पुरवठा बंद होता.

या भागास उद्या (दि.19) पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. तसेच आज रोटेशननुसार असलेल्या शहराच्या मध्यवर्ती भागास उशिराने व कमी दाबाने पाणी पुरवठा करण्यात आला. नागरीकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन मनपाने केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com