विरोधकांमुळे 'अर्बन'च्या ठेवीदारांमध्ये भीती

सुवेंद्र गांधी । निवडणुकीसाठी गाठीभेटी सुरू
नगर अर्बन बँक
नगर अर्बन बँक

अहमदनगर | प्रतिनिधी

नगरं अर्बन बँकेबाबत विरोधकांनी खोटा प्रचार, तक्रारी करत सभासद, ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केल्यामुळे पतसंस्थांसह अनेकांनी ठेवी काढल्या. ही सोशल मीडिया ट्रायल असल्याचे सुरेंद्र दिलीप गांधी यांनी सांगितले.

नगर अर्बन बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभासदांच्या गाठीभेटी निमित्त सुरेंद्र गांधी श्रीरामपूर मध्ये आले होते. यावेळी अॅड. राहुल जामदर, नगरसेवक किरण लुनिया, प्रकाश चित्ते, सुदर्शन शितोळे आदी उपस्थित होते

गांधी म्हणाले, सभासदांच्या विश्वासामुळे नगर अर्बन बँकेच्या शाखा विस्तार झाला. परंतु विरोधकांनी खोटे आरोप केल्यामुळे बँकेची बदनामी झाली. पिंपरी-चिंचवड शाखेत २२कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले. नगर येथे ३ कोटी रुपयांचा चिल्लर घोटाळा आदी आरोप केले. रिझर्व्ह बँकेकडे तक्रारी केल्या.

व्यक्तिगत द्वेषातून जाणीवपूर्वक गुन्हे दाखल केले. बँकेवर प्रशासक आल्यावर अनेक ठेवीदारांनी ठेवी काढून घेतल्या. एनपीए वाढला. बँक ही वित्तीय संस्था असल्याने स्वर्गीय दिलिप गांधी यांनी प्रामाणिक काम केले. आता सर्व पक्षांच्या नेत्यांना बरोबर घेऊन नगर अर्बन बँकेची निवडणुक लढविणार असून सभासदांच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे गांधी यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com