'सहकार'चे शक्ती प्रदर्शन

'सहकार'चे शक्ती प्रदर्शन

अहमदनगर | प्रतिनिधी

नगर अर्बन बँकेच्या निवडणुकीसाठी (Nagar Urban Bank Election) सहकार पॅनलने शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले.

नगर अर्बन बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी स्व. दिलीप गांधी प्रेरित सहकार पॅनलच्या सर्वच्या सर्व १८ उमेदवारांनी आज सकाळी ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात महाआरती केली. यावेळी माळीवाडा ते जिल्हा सहकारी बँके मधील निवडणूक कार्यालयापर्यंत मिरवणुकीने जाऊन जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

यावेळी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, उद्दोजक मोहन मानधना, श्रीमती सरोज गांधी, मर्चंट बँकेचे संचालक अनिल पोखरणा, माजी जी.प. अध्यक्ष विठ्ठल लंघे, सहकार महर्षी सुवालाल गुंदेचा जैन ओसवाल पतसंस्थेचे चेअरमन किरण शिंगी, शिवसेनेचे संजय शेंडगे, मर्चंट बँकेचे माजी चेअरमन महोन मानधना, नेवासा पं.स.चे सभापती भगवानराव गंगावणे, नेवासा शिवसेना तालुका प्रमुख मच्छिंद्र म्हसे आदींसह भाजपचे सर्व नगरसेवक व विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होत.

अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सहकार पॅनल मधून भैय्या गंधे, नेवाश्याचे उद्दोजक सचिन देसार्डा, माजी संचालक आज बोरा व गांधी परिवारा तर्फे सौ. दीप्ती सुवेन्द्र गांधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सुवेंद्र गांधी म्हणाले, अर्बन बँकेच्या बाबतीत मागील काळात ज्या घटना घडल्या त्यावर परदा टाकण्याची हि निवडणूक आहे. सहकार पॅनलच्या सर्व १८ उमेदवारांनी आपला अर्ज दाखल केला आहे. स्व. दिलीप गांधी यांनी बँकेचे पाहिलेले स्वप्न पूर्ण करणार आहोत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com