फडणवीस ‘अर्बन’ला पाठबळ देणार

फडणवीस ‘अर्बन’ला पाठबळ देणार

अहमदनगर (प्रतिनिधी)

खासदार म्हणून चांगले काम करणारे स्व.दिलीप गांधी (dilip gandhi) यांनी भारतीय जनता पक्ष (bjp) जिल्ह्यात वाढवण्यासाठी भरीव योगदान दिले आहे. त्यांच्या पश्चात गांधी परिवारामागे कायम उभा राहणार आहे. नगर अर्बन बँकेत (nagar urban bank) निर्माण झालेली परिस्थितीत बदलण्यासाठी केंद्रीय स्तरावर पाठपुरावा करून बँकेचा कारभार पूर्वपदावर येण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil), माजी मंत्री गिरीश महाजन (girish mahajan) आदींनी बुधवारी सायंकाळी दिवंगत माजी खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी जाऊन गांधी परिवाराची भेट घेतली. स्व.गांधी यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

यावेळी श्रीमती सरोज गांधी, सुवेंद्र गांधी, देवेंद्र गांधी, अर्बन बँकेच्या व्हाईस चेअरमन दिप्ती गांधी यांचे सांत्वन करून देवेंद्र फडणवीस यांनी स्व. दिलीप गांधी यांच्या आठवणींना उजाळा दिला. अर्बन बँकेचे संचालक अशोक कटारिया, अनिल कोठारी, दीपक गांधी, अजय बोरा, महेंद्र गंधे, कमलेश गांधी, संपत बोरा, शैलेश मुनोत, संगीता गांधी, मनेश साठे, राहुल जामगावकर, सचिन देसार्डा आदींनीही देवेंद्र फडणवीस यांच्याशी अर्बन बँके संदर्भात चर्चा करून लवकरात लवकर निर्बंध मागे घेण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती केली.

तसेच माजी मंत्री राम शिंदे (ram shinde) यांनीही यावेळी देवेंद्र फडणवीस यांना बँकेच्या प्रश्नात लक्ष घालण्याची विनंती केली. यावेळी आ.राधाकृष्ण विखे (radhakrishn vikhe), खा,सुजय विखे (sujay vikhe), आ.बबनराव पाचपुते (babanrao pachpute), अनिल पोखरणा, अ‍ॅड. राहुल जामदार, रसिक कोठारी, आशिष अनेचा, रवी गांधी, डॉ. ज्ञानेश्वर दराडे आदींसह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.फडणवीस ‘अर्बन’ला पाठबळ देणार

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com