अनधिकृत फ्लेक्स बोर्डने घेतला युवकाचा बळी

अनधिकृत फ्लेक्स बोर्डने घेतला युवकाचा बळी

अहमदनगर|Ahmedagar

वाढदिवसाचा फ्लेक्स बोर्ड लावत असताना एका युवकाला विजेचा धक्का बसला यात त्याचा मृत्यू झाला. सौरभ सुरेश चौरे (वय २२ रा. नालेगाव) असे मृत युवकाचे नाव आहे.

सावेडी उपनगरातील प्रोफेसर काॅलनी चौकात गुरूवारी पहाटे ही घटना घडली. दरम्यान शहरातील अनधिकृत फ्लेक्स बोर्डने यापूर्वी अनेकांचे बळी गेले आहे. महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.

नगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत फ्लेक्स बोर्ड लावले जातात याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. फ्लेक्स बोर्ड लावताना विजेचा धक्का लागून, खाली पडून यापूर्वी अनेकांचे मृत्यू झाले आहे.

गुरुवारी पहाटे सौरभ चौरे हा युवक प्रोफेसर कॉलनी चौकात वाढदिवसाचे फ्लेक्स लावत असताना त्याला विजेचा धक्का लागला. यामुळे तो जमिनीवर कोसळला. त्याच्या डोक्याला मार लागला होता.

जखमी सौरभला उपचारासाठी तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक फौजदार केदार करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com