नेवाशाच्या 'त्या' पोलीस कर्मचाऱ्याची बदली

नेवाशाच्या 'त्या' पोलीस कर्मचाऱ्याची बदली

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmedagar

नेवासा पोलीस ठाण्यातील वाहतूक शाखेला काम करणारे पोलीस कर्मचारी किरण गायकवाड यांची पारनेर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

दोन दिवसांपूर्वी पोलीस कर्मचारी व वाहतूक संघटनेचे पदाधिकारी यांच्या संभाषणाची एक ऑडीओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. यानंतर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी ही बदली केली आहे. याबाबत शुक्रवारी रात्री आदेश काढला आहे.

या ऑडीओ क्लीप मधील पोलीस कर्मचारी एका प्रवासी वाहतूक संघटनेच्या उपाध्यक्षावर खोटा अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत असल्याचे या संभषणातून समोर आले आहे. १३ मिनीटांच्या या संभाषणातून वाहतूक शाखेत चालणारी हप्तेखोरी उघड झाली आहे. अवैध प्रवासी वाहतूक व यातून पोलिसांना दिले जाणारे हप्ते या संभाषणातून अधोरेखित झाले आहे. यानंतर नेवासा तालुका टो रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले होते.

पोलीस कर्मचारी किरण गायकवाड व इतर तीन ते चार वाळू तस्करांनी खोट्या अॅट्रोसिटी गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली होती. अधीक्षक पाटील यांनी व्हायरल ऑडिओ क्लिप संदर्भात नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. तो अहवाल सादर झाल्यानंतर अधीक्षक पाटील यांनी बदली बाबत आदेश काढला आहेत.

Related Stories

No stories found.