नगर शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी

विकेंड लॉकडाऊननंतर नागरिकांची खरेदीसाठी गर्दी
नगर शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी

अहमदनगर (प्रतिनिधी) / Ahmednagar - दोन दिवसांच्या विकेंड लॉकडाऊननंतर सोमवारी सकाळीच मोठ्या प्रमाणात लोक घराबाहेर पडले. यामुळे नगर शहरात वाहतूक कोंडी झाली होती. दोन दिवस सततच्या पावसामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी चिखल, पाण्याचे डबके होते. त्यातच महापालिकेकडून शहरात विकासकामे सुरू आहेत. उड्डाणपुलाचे काम देखील सुरू आहे. यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत असते.

करोनामुळे शनिवार व रविवार दोन दिवस विकेंड लॉकडाऊन लागू केला आहे. सामान खरेदी, नोकरी - व्यवसाय यामुळे सोमवारी नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. जिल्हाधिकारी कार्यालय रस्त्यावर नागरिकांची गर्दी होती. त्यात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत.

तसेच, माळीवाडा, आयुर्वेद चौक, दाळमंडई, कापडबाजार या ठिकाणांसह शहरातील मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडी झाली होती. दाळमंडईमध्ये व्यापार्‍यांनी खरेदीसाठी गर्दी केल्याने तेथेही वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान, शहर वाहतूक शाखेकडून कोणतेच नियोजन केले जात नसल्याचे दिसून येत आहे. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर वेळेची मर्यादा आहे, परंतु वाहतूक कोंडीमुळे अधिक वेळ जात असल्याने यातून मार्ग काढण्याची मागणी होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com