अहमदनगर (प्रतिनिधी) - मार्चएन्डपासून सुरू झालेला बाधितांच्या आकड्याने कालपर्यंत हजारीपार केल्याचे दिसले. आज मात्र दोन हजारी पार करत नगरकरांच्या चिंतेत भर टाकली आहे. शहरासह आठ तालुक्यात शंभरी पार झाल्याने जिल्ह्यात उपचार घेणार्या कोरोनाग्रस्तांची संख्या आता 12 हजारीच्या घरात पोहचली आहे.

मागील वर्षापासून आजपर्यंतच्या काळात आज गुरूवारी सर्वाधिक कोरोनाबाधितांचा आकडा जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आला आहे. आजपर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा हजार-दोन हजाराच्या दरम्यान असायचा. पण आज कोरोनाग्रस्तांचा आकडा दोन हजार पार करत 2233 वर पोहचला आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने ‘ब्रेक द चेन’ नारा देत निर्बंध कडक केले आहेत. शनिवार, रविवारी कडक लॉकडाऊन जाहीर केले आहे. शासनाने कितीही कडक निर्बंध केले तरी नगरकर बाहेर पडत आहेत. त्यामुळेच बाधितांच्या संख्येत भर पडत असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.

केंद्राचे पथक नगरमध्ये

देशातील टॉपटेन जिल्ह्याच्या यादीत नगरचा सातवा नंबर आहे. रुग्णवाढीचा आकडा पाहता केंद्राने राज्यात 30 पथके पाठविली असून त्यातील एक पथक नगरमध्ये दाखल झाले आहे. जेथे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे, तेथे हे पथक पाहणी करणार आहे. नगरमध्ये थांबून हे पथक बाधितांच्या वाढीची कारणे शोधणार आहे.

आजचा कोरोना

नगर शहर 611

कोपरगाव 99

नेवासा 55

श्रीरामपूर 79

पाथर्डी 114

संगमनेर 198

अकोले 128

राहाता 117

शेवगाव 103

नगर ग्रामीण 187

राहुरी 107

कर्जत 201

भिंगार 54

श्रीगोंदा 40

जामखेड 47

पारनेर 70

परजिल्हा 17

परराज्य 00

मिलिटरी 06