चोरीच्या गुन्ह्यातील तीन आरोपी जेरबंद

तोफखाना पोलिसांची कामगिरी
चोरीच्या गुन्ह्यातील तीन आरोपी जेरबंद

अहमदनगर|Ahmedagar

शहरातील सिंधी काॅलनी (Sindhi Colony) येथील वृद्ध महिलेच्या गळ्यातील चेन चोरणाऱ्या एकाला व शेतामधील वीज मोटार चोरी करणाऱ्या दोघांना तोफखाना पोलिसांनी (Tofhkhana Police) अटक केली आहे.

राजु साहेबराव काते (रा. भास्कर काॅलनी, लालटाकी), अनिकेत सुनील पारधे (वय- २३ रा. कोठी, नगर), सुरेश शिवाजी कटारे (वय-२१ रा. केडगाव) अशी अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत.

शुक्रवारी सकाळी सिंधी कॉलनी येथील सारा देवदान वंजारे (वय 54) या घरामध्ये असताना सव्वा नऊ वाजेच्या सुमारास त्यांच्या घरासमोर एक अनोळखी इसम आला. त्याने आवाज देत पिण्यासाठी पाण्याची मागणी केली. यावेळी वंजारे घराच्या बाहेर आल्या. त्याच क्षणी त्या इसमाने वंजारे यांच्या गळ्यातील सोन्याची चेन ओरबडून धूम ठोकली. याप्रकरणी वंजारे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी तात्काळ शोध घेत आरोपी काते याला अटक केली. त्याच्याकडून पाच ग्रॅमची सोन्याची चेन हस्तगत करण्यात आली आहे.

शेतामधील वीज मोटार चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी कटारे व पारधे यांना अटक करत त्यांच्याकडुन चोरीची एक मोटार व दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली डीबीचे पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे यांच्या पथकातील पोलीस कर्मचारी शकील सय्यद, अविनाश वाकचौरे, वसीम पठाण, अहमद इनामदार, शैलेश गोमसाळे, सचिन जगताप, अनिकेत आंधळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com