रात्रीस खेळ चाले...!

रात्रीस खेळ चाले...!

अहमदनगर l Ahmednagar

नगर शहरात सध्या चोरटे भलतेच सक्रीय झाले आहेत. बुधवारी भल्या पहाटे बालिकाश्रम रोड येथील आर्यन गार्डन या बिल्डींगमधील चोरीचा प्रयत्न सीसीटिव्हीत कैद झाला.

पहाटे तीन वाजता बालिकाश्रम रोड येथील आर्यन गार्डनमध्ये चोरटे बिनधास्त घुसताना दिसत आहेत. यावेळी पार्किंग व जिन्यातील लाईट बंद करून चोर संपूर्ण बिल्डींगमध्ये फिरत होते. त्यांनी काही घरांच्या कड्या बाहेरून लावल्या होत्या. हा प्रकार सकाळी लक्षात आला.

दरम्यान, बालिकाश्रम रोडवरील एका मेडिकलवर याच काळात चोरी झाली. तेथून चोरट्यांनी ८० हजारांचा ऐवज लंपास केला. ऐन सणासुदीच्या तोंडावर चोरटे सक्रीय झाल्याने पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले आहे. मात्र नागरिकांनाही सावध होण्याची वेळ आली आहे.

Related Stories

No stories found.