Ahmednagar : संस्कृतीनगरकडे जाण्या-येण्यासाठी रस्त्याच नाही, नागरिकांचे हाल

नगरसेवकांसह मनपा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी
Ahmednagar : संस्कृतीनगरकडे जाण्या-येण्यासाठी रस्त्याच नाही, नागरिकांचे हाल

अहमदनगर (प्रतिनिधी)

बोल्हेगाव उपनगराचा भाग असलेल्या संस्कृतीनगरमध्ये जाण्या-येण्यासाठी रस्ताच नसल्याने त्या परिसरात राहणार्‍या नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. पावसाळ्यात तर त्यांना मोठी कसरत करावी लागते. या रस्त्याच्या प्रश्‍नाकडे नगरसेवकांसह महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

संस्कृतीनगरमध्ये गेल्या सहा वर्षापासून सुमारे 70 ते 80 कुटूंब राहत असून त्यांच्या दररोजच्या दळणवळणाचा मोठा प्रश्‍न आहे. संस्कृतीनगरवरून जाणारा रस्त्यावर घुले पाटील कॉलेज असून पुढे हाच रस्ता मनमाड रस्त्याला जोडला जातो. नगर शहरात जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर केला जातो. गेल्या सहा वर्षापासून या रस्त्यावर साधा मुरूम देखील टाकला नाही. या परिसरात राहणारे नागरिकांना जाण्या-येण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शाळेत जाणारे मुलांचे हाल होत आहे. रस्ता नसल्यामुळे संस्कृतीनगरमध्ये स्कूल बस येत नाही, पर्यायाने पालकांना मुलांना सोडण्यासाठी जावे लागते.

दुचाकीवरून मुलांना घेऊन महिला प्रवास करत असताना छोटे-मोठे अपघात होत असल्याच्या घटना वारंवार घडत आहे. पावसाळ्यात रस्त्यावर चिखळ तयार झाल्याने पायी चालने देखील कठीण होते. दरम्यान, या रस्त्यासाठी स्थानिक नगरसेवकांसह महापालिका प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. मनपा आयुक्त यांनी रस्त्याची पाहणी करावी, अशीही मागणी नागरिकांनी केली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com