अहमदनगर (प्रतिनिधी) -

घरातील कपाटात ठेवलेले रोकड, सोने-चांदीचे दागिने असा सुमारे 45 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी

तोफखाना पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय महादेव पालवे रा. अक्षदा कॉलनी यांनी तक्रार दिली आहे. अज्ञात चोरट्याविरेधात हा घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पालवे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, यातील फिर्यादी हे त्यांच्या घराला कुलूप लावून बाहेर कामानिमित्त गेले होते. घरात ठेवलेले सोन्याच्या अंगठ्या, दागिने रोकड असा सुमारे 45 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी या घरफोडीत लंपास केल्याचे तक्ररीत म्हटले आहे.