एप्रिलमध्ये दुसरी लाट

पालकमंत्र्यांकडून संकेत । लॉकडाऊनचे नियोजन
एप्रिलमध्ये दुसरी लाट

अहमदनगर (प्रतिनिधी) - कोरोनाची वाढती आकडेवारी पाहता एप्रिलमध्ये दुसरी लाट येण्याचे संकेत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज नगरमध्ये दिले. लॉकडाऊन संदर्भात जिल्हा प्रशासनाची तयारी 1 तारखेपर्यंत पूर्ण होईल, असे ते म्हणाले.

पालकमंत्री मुश्रीफ यांनी आज सोमवारी जिल्हा प्रशासनाची बैठक घेत कोरोना स्थितीची माहिती घेतली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी लॉकडाऊनचे नियोजन करण्याचे सांगितल्यानंतर जिल्हा प्रशासनाची तयारी सुरू झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या लॅबमध्ये रोज अडीच हजार सँपल येतात. क्षमता मात्र एक हजाराची आहे. तपासणी वाढण्याकरिता आणखी मशिन घेतल्या जाणार आहेत. कोरोना नियमांना लोक प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे कडक पावले उचलण्याची वेळ आली आहे. दहावी-बारावी वगळता इतर वर्ग आजपासूनच बंदचे आदेश दिले आहेत.

  • चंद्रकांत पाटलांना समजावून सांगू

  • पुण्यात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लॉकडाऊनला आम्ही विरोध करणार असल्याचे सांगितले आहे. त्याबाबत बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, ‘कोण चंद्रकांत पाटील? ते आमचे का; ते आमच्या जिल्ह्यातील का.? त्यांना आम्ही समजून सांगू, असे सांगत लॉकडॉऊन शेवटचा पर्याय असल्याचे पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले.

  • सरसकट लस द्या

  • केंद्र सरकारने बाहेरच्या देशांना लस देण्यापेक्षा देशातील विविध राज्यांना पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावी. केंद्र सरकारने जी वयाची अट टाकली आहे ती देखील बंद करण्यात यावी. लस खुल्या बाजारात उपलब्ध करण्याची मागणीही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केली.

  • फौजदारामुळे सरकार अस्थिर नाही

  • वाजे प्रकरणामुळे सरकार अस्थिर झाल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत बोलताना पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले की, ‘जो पर्यंत सोनिया गांधी, शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या मनात आहे तो पर्यत पुढचे 25 देखील या सरकारला धोका नाही. जो फुटेल त्यांच्या विरोधात संपूर्ण महाविकास आघाडी एकत्र पणे सामना करेल असेही त्यांनी सांगितले. एका फौजदारामुळे महाविकास आघाडी सरकार अस्थिर नसल्याचे ते म्हणाले.

मिनिस्टर मुश्रीफ बोले...

  • एकूण तपासणी 468981

  • पॉझिटिव्ह 90795

  • दहा दिवसांत 8265ची भर

  • कोरोना उपचार घेणारे रुग्ण 5242

  • नगर शहरात आगरकर मळा, वसंत विहार, नांगरे गल्ली कंटेनमेंट

  • नववी, अकरावीचे वर्ग आजपासून बंद (दहावी, बारावी मात्र सुरू)

  • हॉटेलची रात्री 8 नंतरची पार्सल सुविधाही बंद

  • होम आयसोलेशन बंद

  • पुढच्या 100 दिवसांचे प्लॅनिंग

  • 1 मे रोजी नगरमध्ये नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व्हर्च्यूअल उद्घाटन

  • 2 मेपासून कार्यालयाचे कामकाज नव्या इमारतीतून

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com