
अहमदनगर (प्रतिनिधी)
राज्य सरकारच्या गृह विभागाने शुक्रवारी राज्यातील पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांच्या बदल्या केल्या.
अपर पोलीस महासंचालक (आस्थापना) संजीव कुमार सिंघल यांनी याबाबत आदेश काढले आहेत. नगर जिल्ह्याला चार पोलीस निरीक्षक मिळाले आहेत. कोल्हापूर येथून चंद्रकांत निरावडे, नांदेड येथून शिवाजी डोईफोडे, गडचिरोली येथून संतोष खेडकर, मुंबई शहर येथून महेश पाटील यांची नगर जिल्ह्यात बदली झाली आहे.
येथील पोलीस निरीक्षक विकास वाघ यांची धुळे येथे बदली झाली. अकोला पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक मिथून घुगे यांची फोर्स वन युसीटीसी येथे, सतिष गावित यांची राज्य पोलीस नियंत्रण कक्षात तर उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे यांची मसुप येथे बदली झाली आहे.