काँग्रेस ही सर्व समाज घटकांना सोबत घेऊन चालणारी विचारधारा

ना. नितीन राऊत : काँग्रेस पदाधिकार्‍यांशी साधला संवाद
काँग्रेस ही सर्व समाज घटकांना सोबत घेऊन चालणारी विचारधारा

अहमदनगर (प्रतिनिधी)

देशात सध्या भाजप सरकारने अनागोंदी निर्माण केली आहे. धार्मिक द्वेष निर्माण केला आहे. अशा स्थितीत देशाला काँग्रेस विचारधारेची गरज असून काँग्रेस विचारधारा ही समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन चालणारी विचारधारा असल्याचे प्रतिपादन राज्याचे ऊर्जा मंत्री ना. नितीन राऊत यांनी केले आहे.

औरंगाबादला जात असताना ना.राऊत गुरूवारी रात्री नगरला शासकीय विश्रामगृहावर थांबले होते. त्यावेळी त्यांनी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांशी संवाद साधण्यासाठी थांबले होते.

काँग्रेस ही सर्व समाज घटकांना सोबत घेऊन चालणारी विचारधारा
शरद पवारांच्या भेटीसाठी प्रशांत किशोर 'सिल्व्हर ओक'वर; कोणती रणनीती ठरणार?

यावेळी आ. लहू कानडे, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, उपाध्यक्ष खलील सय्यद, विद्यार्थी काँग्रेस प्रभारी अनिस चुडीवाला, क्रीडा शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते, युवक काँग्रेस अध्यक्ष अक्षय कुलट, अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख, सेवादल महिला शहर जिल्हाध्यक्ष कौसर खान, इंटक काँग्रेस जिल्हाध्यक्ष हनिफ शेख, मागासवर्गीय विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे, मागासवर्गीय विभाग शहर जिल्हाध्यक्ष नाथा अल्हाट, एससी विभाग प्रदेश समन्वयक संजय भोसले, प्रदेश समन्वयक नामदेवराव चांदणे, काँग्रेस नेते फारुक शेख, शहर जिल्हा उपाध्यक्ष प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, शहर जिल्हा सचिव प्रशांत वाघ, लोकेश बर्वे, शहर जिल्हा सचिव अन्वर सय्यद, विद्यार्थी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष वीरेंद्र ठोंबरे, क्रीडा शहर जिल्हा सचिव मच्छिंद्र साळुंखे, क्रीडा विभाग खजिनदार नारायण कराळे, उमेश साठे, अभिनय गायकवाड, शरीफ सय्यद, युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस मोसिम शेख आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com