जिल्ह्यातील ग्रामपंचायती मालामाल

४१ कोटी मिळणार, जूनपर्यंत निम्मा निधी खर्च करावा लागणार
जिल्ह्यातील ग्रामपंचायती मालामाल

अहमदनगर (प्रतिनिधी)

जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी १५ व्या वित्त आयोगाकडून मागील वर्षीचा ४९ कोटी ७२ लाखांचा दुसरा हप्ता जाहीर झाला आहे.

यापूर्वी गेल्या दोन वर्षांत ग्रामपंचायतींना ३७४ कोटी, पंचायत समिती व जिल्हा परिषदेला प्रत्येकी १० टक्के प्रमाणे ४६ कोटी ७८ लाख असा एकूण ४६७ कोटींचा निधी मिळालेला आहे. त्यात आता आणखी निधीची भर पडली. त्यामुळे गावागावांत विकास कामांची भर पडणार आहे. १५ व्या वित्त आयोगाच्या दुसऱ्या हप्त्यात ग्रामपंचायतींना ४० कोटी ५३ लाख तर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांना प्रत्येकी ४ कोटी ५९ लाखांचा निधी मिळणार आहे.

जिल्ह्यातील ग्रामपंचायती मालामाल
'त्या' जाहिरातीसाठी अक्षय कुमारला माफी का मागावी लागली?

१५ व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींना ८० टक्के, तर जिल्हा परिषद व पंचायत समितीला प्रत्येकी १० टक्केप्रमाणे रक्कम विकास कामांसाठी मिळते. २०२० ते २०२५ या पाच वर्षांत १५ व्या वित्त आयोगाचा निधी उपलब्ध होणार आहे. त्यानुसार २०२०-२१ चे दोन हप्ते व २०२१ २२ चा पहिला हप्ता असा एकूण ४६७ कोटी ८० लाख ७० हजार रुपयांचा निधी नोव्हेंबर २०२१ अखेर प्राप्त झाला होता. यातून ग्रामपंचायतींना ३७४ कोटी २३ लाख, तर पंचायत समिती व जिल्हा परिषदेला प्रत्येकी ४६ कोटी ७८ लाखांचा निधी वाटप करण्यात आला.

२०२१-२२ चा दुसरा हप्ता अद्याप जाहीर झाला नव्हता. केंद्राकडून हा निधी आल्यानंतर ग्रामविकास विभागाने १३ एप्रिलला त्याबाबत आदेश काढले. त्यानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना ८६१ कोटींचा निधी मिळणार आहे. यात नगर जिल्ह्यासाठी अनटाईड निधीपोटी ४९ कोटी ७३ लाखांचा निधी जाहीर झाला असून तो लवकरच मिळेल, अशी माहिती ग्रामपंचायत विभागाकडून मिळाली.

जिल्ह्यातील ग्रामपंचायती मालामाल
VIDEO : जवानांनी भरलेल्या बसवर मोठा दहशतवादी हल्ला

१५ व्या वित्त आयोगाचा निधी अनटाइड व टाइड अशा दोन प्रकारचा असतो. अनटाइड निधी गावातील विकास कामांच्या गरजेनुसार वापरला जातो, तर टाइड निधी हा शासनाकडून ठरविण्यात आलेल्या फक्त ठराविक कामांसाठीच खर्च करायचा असतो. आतापर्यंत अनटाइडचे तीन व टाइड निधीचे तीन हप्ते प्राप्त झाले आहेत. आता हा पुन्हा अनटाईडचा चौथा हप्ता आला आहे. दुसऱ्या हप्त्यापोटी मिळालेल्या या निधीतून ५० टक्के रक्कम जून २०२२ पर्यंत प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेने खर्च करावी, अशा शासनाच्या सूचना आहेत. त्याशिवाय पुढील हप्ताचे वितरण होणार नसल्याचे शासनाने कळवले आहे.

जिल्ह्यातील ग्रामपंचायती मालामाल
आलिया-रणबीरच्या विवाहसोहळ्याचे फोटो पाहिलेत का?

Related Stories

No stories found.