अहमदनगर टेनिसबॉल क्रिकेट असोसिएशन अध्यक्षपदी सेठी तर सचिवपदी बलराज

अहमदनगर टेनिसबॉल क्रिकेट असोसिएशन अध्यक्षपदी सेठी तर सचिवपदी बलराज

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

महाराष्ट्र टेनिसबॉल क्रिकेट असोसिएशनची संलग्नता मिळालेल्या अहमदनगर टेनिसबॉल क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी श्रीरामपूर येथील लकी सेठी तर सचिवपदी नितीन बलराज यांची नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीचे पत्र महाराष्ट्र टेनिसबॉल असोसिएशनचे सचिव जयंत वासनिक यांच्याकडून नुकतेच मिळाले.

मागील अनेक वर्षापासून श्रीरामपूरच्या क्रीडा वैभवात सेठी व बलराज यांचे कार्य कौतुकास्पद आहे. अहमदनगर टेनिसबॉल असोसिएशनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील खेळाडूंना टेनिसबॉल क्रिकेटमध्ये चांगल्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी या दोघांच्या खांद्यावर आली आहे.

असोसिएशनच्या माध्यमातून आगामी काळात श्रीरामपुरात राज्य व राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या नियुक्तीबद्दल सेठी व बलराज यांचे महाराष्ट्र टेनिस बॉल असोसिएशनचे अध्यक्ष अजय भगत, उपाध्यक्ष स्वप्निल झुर्मुरे, सचिव जयंत वासनिक यांनी अभिनंदन केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com