वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव मंजूर

नगर पेन्शन हक्क संघटनेच्या पाठपुराव्याला यश...
वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव मंजूर

अहमदनगर । Ahmednagar

जिल्हाभरातील वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणीचे सर्व प्रस्ताव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष खेरेकर यांनी स्वाक्षरी करून पारित केले आहेत.

या कामी पेन्शन हक्क संघटनेने सातत्याने निवेदने देत वरिष्ठ वेतन श्रेणी मंजूर करण्यासाठी पाठपुरावा केलेला होता. यासाठी शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी प्रयत्न करत हा प्रश्न मार्गी लावला. तसेच पेन्शन हक्क संघटनेने सातत्याने प्रयत्न केला होता.

गेल्या तीन वर्षापासून रखडलेले प्रस्ताव बराच काळ उलटूनही मंजूर न झाल्याचे पाहून पेन्शन हक्क संघटनेने नुकतेच जिल्हा परिषद विरोधात आंदोलनाची हाक दिली होती; परंतु तत्पूर्वीच प्रशासनाने गांभीर्याने विषय घेत सदर वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतनश्रेणीचा प्रश्न मार्गी लावत जिल्ह्यातील लाभार्थी शिक्षकांना सुखद बातमी दिलेली आहे. त्याबद्दल पेन्शन हक्क संघटनेकडून प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानण्यात येत आहे.

सदर पाठपुरावा करणे कामी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ठोकळ, सरचिटणीस भाऊसाहेब पाचारणे, कार्याध्यक्ष सचिन नाबगे, कोषाध्यक्ष अमोल सोनवणे, पेन्शन हक्क संघटनेचे नेते बाजीराव मोढवे, ज्ञानेश्वर सोनवणे, शरद कोतकर, योगेश थोरात, बाबुराव कदम, सय्यद ताऊसिफ, प्रतीक नेटके, केशव कोल्हे, राज कदम, मच्छिंद्र भापकर, देवेंद्र आंबेडकर, राज चव्हाण, सतीश पठारे, नाना गाढवे, विनोद देशमुख, अशोक जाधव, प्रशांत गवारी, अर्जुन तळपाडे, प्रवीण झावरे, जयवंत ठाणगे, अमोल साळवे, अविनाश नवसरे, भाऊसाहेब गिरमकर, अरुण पठाडे, नितीन भोईटे, लक्ष्मीकांत वाडीले, सचिन गांडोळे, प्रदीप बागुल, देवा सदगीर, रुपेश वाकचौरे, आदी शिलेदारांनी प्रयत्न केले.

संघटनेच्या पाठपुराव्यामुळे आणि काम करण्याच्या पद्धतीमुळे शिक्षकांच्या अनेक प्रश्न वेळी मार्गी लागत आहेत, याबद्दल संघटनेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com