
अहमदनगर (प्रतिनिधी)
आधी दोन वर्षापासून कोविड आणि तिसरे वर्षे ऑनलाईन बदलीच्या प्रक्रियेत रखडल्यानंतर नोव्हेंबर महिन्यांपासून सुरू झालेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदलीच्या प्रक्रियेत आतापर्यंत 662 गुरूजीची बदली झाली आहे.
शुक्रवारी संवर्ग 3 मधील 191 शिक्षकांचा यात समावेश आहे. दरम्यान, आता संवर्ग चारच्या शिक्षकांच्या बदल्याची प्रक्रिया शिल्लक असून येत्या आठ ते दहा दिवसांत ती पूर्ण होणार आहे.
चाल आठवड्यात मंगळवार (दि.17) रोजी संवर्ग 3 मध्ये बदली अधिकार प्राप्त शिक्षक ज्यांनी पेसा (आदिवासी भागात) किमान तीन वर्षे सेवा केलेले शिक्षक अशा 218 शिक्षकांनी बदलीसाठी ऑनलाईन अर्ज दाखल केले होते.
त्यांची बदलीची प्रक्रिया गुरूवारी पूर्ण होवून शुक्रवार (दि.20) रोजी बदली झालेल्या शिक्षकांची यादी ऑनलाईन पध्दतीने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला प्राप्त झाली आहे. यात 218 शिक्षकांनी अर्ज केलेले असतांना पात्र असणार्या 191 शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत.
नगरसह राज्यात 30 नोव्हेंबरपासून ऑनलाईन पध्दतीने गुरुजींच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू झाल. यात जिल्ह्यातील संवर्ग एक मधील 299 शिक्षकांच्या बदल्या झाल्या असून पती-पत्नी एकत्रिकरण (संवर्ग दोन) मध्ये 172 शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत. काल मंगळवारी संवर्ग 3 मध्ये बदली अधिकार प्राप्त शिक्षक ज्यांनी पेसा (आदिवासी भागात) किमान तीन वर्षे सेवा केलेल्या 191 शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत 662 शिक्षकांच्या बदल्या झाल्या असून आता संवर्ग 4 मधील बदली पात्र शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया होणार आहे. या चारही संवर्गातील शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया झाल्यानंतर 18 फेबु्रवारीपर्यंत बदली झालेल्या शिक्षकांना बदलीचे आदेश मिळणार असल्याचे जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
राज्यात 4 हजार 300 शिक्षक संवर्ग तीनमधून बदलीसाठी पात्र होते. यातून 3 हजार 38 शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. झालेल्या बदल्याची टक्केवारी ही 78 टक्के आहे. यात बुलढाणा 39, धुळे 18, हिंगोली 17, वर्धा 2, यवतमाल 84, जळगाव 137, औरंगाबाद 181, सांगली 62, सिंधूदुर्ग 135, वाशिम 34, कोल्हापूर 77, रायगड 237, अहमदनगर 191, नागपूर 57, नांदेड 130, पालघर 283, ठाणे 129, गोंदिया 30, पुणे 382, सातारा 145, रत्नागिरी 299, चंद्रपूर 41, अकोला 35, नाशिक 223, नंदूरबार 48, अमरावती 16, गडचिरोली 6 असे आहे.