'त्या' पाच गुरूजींवर निलंबानाची कारवाई प्रस्तावित

दोघांकडून मुलींची छेडछाड, दोघांनी ठेवले डमी शिक्षक, एकाचा कामात हालर्गीपणा
'त्या' पाच गुरूजींवर निलंबानाची कारवाई प्रस्तावित

अहमदनगर | प्रतिनिधी

वर्गात मुलींची छेडछाड करणे, स्वत:च्या शाळेत डमी बेरोजगार शिक्षकांची नेमणूक करत अध्यापन करून घेणे आणि पर्यवेक्षण कामात हालगर्जीपणा करणे पाच शिक्षकांना चांगलेच महागात पडणार आहे. या पाच शिक्षकांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

पारनेर तालुक्यातील हिवरेकोरडा येथील मांजरधाव प्राथमिक शिक्षकाने स्वत: अध्यापन करण्याऐवजी परस्पर खासगी बेरोजगार डीएड शिक्षकांची नेमणूक स्वत: त्यापोटी पगार घेतल्याचे समोर आले होते. गेली अनेक वर्षापासून हा प्रकार सुरू असल्याचे शिक्षण विभागाच्या तपासणीत समोर आले होते.

'त्या' पाच गुरूजींवर निलंबानाची कारवाई प्रस्तावित
विवाहित तरुणाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

असाच प्रकार संगमनेर तालुक्यातील कारेगाव येथील झेडपीच्या शाळेत समोर आला होता. रमेश शिवाजी आहेर नावाच्या शिक्षकांने बेरोजगार शिक्षकांची परस्पर नेमणूक करत त्यांच्याकडून अध्यापन करून घेतले होते. याबाबत थेट मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे माहिती दिल्यानंतर त्यांनी त्याठिकाणी गुप्तपणे तपासणी केली असता शिक्षक आहेर याचे कृत्य समोर आले होते.

'त्या' पाच गुरूजींवर निलंबानाची कारवाई प्रस्तावित
जगातील सर्वात लांब रिव्हर क्रूझ ‘एमव्ही गंगा विलास’ला PM मोदींनी दाखवला हिरवा झेंडा; सुविधा अन् भाडे ऐकून हैराण व्हाल

तर राहुरी तालुक्यातील निंभेरेच्या शाळेत मुलींची छेडछाड प्रकरणी शिक्षक मदन दिवे याच्यावर ठपका ठेवण्यात आला असून पारनेर तालुक्यातील पाडळी दर्‍या येथील शिक्षक पोपट फाफाळे यांनी देखील वर्गातील मुलींची छेड काढली होती.

यासह संगमनेर तालुक्यातील जवळे बाळेश्‍वर येथील केंद्र प्रमुख प्रभाकर रोकडे यांनी पर्यवेक्षिय कामात हालगर्जीपणा केला होता. यामुळे या पाच शिक्षकांच्या केलेल्या प्राथमिक तपासणीत ते दोषी आढळले असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. पुढील आठवड्यात ही कारवाई होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

'त्या' पाच गुरूजींवर निलंबानाची कारवाई प्रस्तावित
काकोरी कट - ९ ऑगस्ट १९२५

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com