एसपी कार्यालयातील 'त्या' प्रकरणाची चौकशी सुरू

एसपी कार्यालयातील 'त्या' प्रकरणाची चौकशी सुरू

अहमदनगर (प्रतिनिधी)

सायबर पोलिसांनी (Cyber ​​police) फिर्याद न घेतल्याच्या रागातून एका महिलेने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या (Ahmednagar SP Office) इमारतीमधील पहिल्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला होता. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी या घटनेची गंभीर दखल घेत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) अजित पाटील (Ajit Patil) यांना दिले आहेत.

दरम्यान सदरची महिला श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यातील असून तीने तिच्यावर झालेल्या अन्याय प्रकरणी सुरूवातीला बेलवंडी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली होती. नंतर ती सायबर पोलीस ठाण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणाची आता पोलिसांकडून चौकशी केली जाणार असल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

एसपी कार्यालयातील 'त्या' प्रकरणाची चौकशी सुरू
'शहनाज गिल'चा किलर लूक, फोटोंवरुन हटणार नाही नजर!

बुधवार, २० एप्रिल रोजी दुपारी सदर महिला पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये सायबर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आली होती. तिचा फोटो एका व्यक्तीने सोशल मीडियावर व्हायरल केला असल्याची तिची तक्रार होती. यासंदर्भात तक्रार देण्यासाठी ती महिला आधी बेलवंडी पोलीस ठाण्यात गेली होती. त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितले. त्यामुळे ती महिला सायबर पोलीस ठाण्यात गेली होती.

मात्र, सायबर पोलिसांनी तुमची तक्रार आमच्या पोलीस ठाण्याअंतर्गत येत नाही, असे सांगितल्याने चिडलेल्या महिलेने पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पाहिल्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी तिच्याविरूध्द भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

एसपी कार्यालयातील 'त्या' प्रकरणाची चौकशी सुरू
पांढरी साडी अन् साधा भोळा अंदाज, पाहा 'आर्ची'चे खास फोटो

Related Stories

No stories found.