वृध्दाची गळफास घेत आत्महत्या

वृध्दाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर (प्रतिनिधी)

वृध्दाने खोलीमध्ये दोरखंडाच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना नगर तालुक्यातील निमगाव वाघा गावात घडली.

साधू नाना पुंड (वय 75) असे आत्महत्या केलेल्या वृध्द व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी गावातील शाळेसमोर असलेल्या त्यांच्या मालकीच्या खोलीत ही आत्महत्या केली.

खोलीमध्ये दोरखंडाला लटकलेल्या अवस्थेत असलेला त्यांचा देह पाहून त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून साधू पुंड यांनी आत्महत्या का केली? याचा तपास नगर तालुका पोलीस करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com