राज्यात 78 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप

नगरच्या ऊस गाळपात ज्ञानेश्वरची सहकारात आघाडी
राज्यात 78 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप

नेवासा |सुखदेव फुलारी| Newasa

यंदाचे सध्या सुरू असलेल्या गळीत हंगामात राज्यातील एकूण 118 साखर कारखान्यांनी 11 नोव्हेंबर 2021 अखेर 77.81 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून 65.43 लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे.राज्याचा सरासरी साखर उतारा 8.41 टक्के आहे.

नगर जिल्ह्यातील 17 कारखान्यांकडून 9 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण असून भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने 95 हजार 810 मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून नगर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्याचे ऊस गाळपात आघाडी घेतलेली आहे. दि.11 नोव्हेंबर 2021 अखेर राज्यातील 55 सहकारी व 63 खाजगी अशा एकूण 118 साखर कारखान्यांचे विभाग निहाय झालेले ऊस गाळप, साखर उत्पादन, साखर उतारा खालील प्रमाणे-

विभाग - ऊस गाळप लाख मे. टन--साखर उत्पादन लाख क्विंटल--साखर उतारा टक्के

- कोल्हापूर विभाग - 23.45 22.11 9.43


- पुणे विभाग - 19.18 16.61 8.66

- सोलापूर विभाग - 18.20 14.30 7.86


- अ.नगर विभाग - 9.85 7.57 7.69


- औरंगाबाद विभाग - 2.51 1.61 6.41


- नांदेड विभाग - 4.05 2.80 6.91


- अमरावती विभाग - 0.57 0.43 7.54


- नागपूर विभाग - 00.00 00.00- 00.00

-------------------------------------------------------------------

एकूण - 77.81 65.43 8.41

--------------------------------------------------------------------

नगर जिल्ह्यातील 17 कारखान्यांकडून 9 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण...

नगर जिल्ह्यातील 12 सहकारी व 5 खाजगी अशा एकूण 17 साखर कारखान्यांनी 11 नोव्हेंबर 2021 2021 अखेर 9 लाख 24 हजार 414 मेट्रिक टन उसाचे गाळप करून 7 लाख 11 हजार 155 क्विंटल साखर निर्मिती केली आहे.जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा 07.70 टक्के आहे.नगर जिल्ह्यातील एकूण 9 लाख 24 हजार 414 मेट्रिक टन ऊसा पैकी 11 सहकारी साखर कारखान्यांनी 6 लाख 04 हजार 466 मेट्रिक टन तर 5 खाजगी साखर कारखान्यांनी 3 लाख 19 हजार 948 मेट्रिक टन ऊसाचे गाळप पूर्ण केलेले आहे.

नगर जिलाह्यातील 17 साखर कारखान्यानी 11 नोव्हेंबर 2021 अखेर केलेले ऊस गाळप,साखर उत्पादन व सरासरी साखर उतारा पुढील प्रमाणे...

अ.नं. कारखाना ऊस गाळप मे. टन साखर उत्पादन क्विंटल सरासरी उतारा टक्के

1) ज्ञानेश्वर 95810 83830 8.8

2) मुळा 67160 43800 6.5


3) संजीवनी 52390 43550 8.3

4) कोपरगाव 56901 44900 7.9


5) गणेश 13050 5775 4.4


6) अशोक 38340 29450 7.7


7) श्रीगोंदा 76960 63375 8.2

8) संगमनेर 95810 83830 8.8


9) वृद्धेश्वर 12995 6525 5.0

10) अगस्ती 35580 26430 7.4


11) केदारेश्वर 18570 10300 5.6


12) कुकडी 36800 23350 6.4


13) अंबालिका 195045 158850 8.1


14) गंगामाई 62300 42300 6.8


15) साई कृपा,देवदैठण 29998 27200 9.1


16) प्रसाद शुगर 3650 00.00


17) जय श्रीराम 28955 21820 7.5

------------------------------------------------------------------------------------------------------------

एकूण 924414 711155 7.7

------------------------------------------------------------------------------------------------------------

यंदाचा ऊस गळीत हंगाम 15 ऑक्टोबर पासून सुरू झालेले आहेत. नगर जिल्ह्यातील 23 केवळ पैकी 17 साखर कारखान्याचे हंगाम सुरू आहेत.नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने 18 दिवसात 95 हजार 810 मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून नगर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्याचे ऊस गाळपात आघाडी घेतलेली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com