खाजगी वाहतूकदारांची मनमानी थांबवा

सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा
खाजगी वाहतूकदारांची मनमानी थांबवा

अहमदनगर (प्रतिनिधी)

एसटी महामंडळाच्या संपामुळे खाजगी वाहतूकदारांनी आपली मनमानी सुरू केली असून गोरगरिबांना प्रवास करणे शक्य होत नसून मोठया प्रमाणावर आर्थिक पिळवणूक होत आहे.

खाजगी वाहतूकदारांवर ताबडतोब कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

एसटी महामंडळाच्या संपामुळे काही खाजगी वाहतूकदारानी व संस्था चालकांनी मोठया प्रमाणात आर्थिक पिळवणूक सुरु केली असून नगर-पुणे भाडे ८०० रुपये, नगर-मुंबई भाडे १६०० अशा चढ्या भावाने बेकायदेशीर मागणी करून प्रवाशांची आर्थिक पिळवणूक सुरु आहे.

या बाबत प्रशासन ही कोणतीही कारवाई करीत नसल्यामुळे काही खाजगी वाहतूकदार आपली मनमानी करीत आहेत. या परिस्थितीमध्ये सामान्य जनतेला प्रवास करणेही शक्य होत नाही. याबाबत प्रशासन व राज्यकर्ते यांनी या प्रकरणात लक्ष घालून एस टी महामंडळाचा संप मिटवाबा व जो पर्यंत संप मिटत नाही तोपर्यंत प्रवासी वाहतुकीची पर्यायी व्यवस्था जनतेसाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोजा यांनी एका निवेदनाद्वारे केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com