अहमदनगर (प्रतिनिधी) -

राज्यातील शिधापत्रिकाधारकांचा आढावा घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर अपात्र शिधापत्रिकांसाठी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश

देण्यात आले आहेत. त्यामुळे अनेकांची कार्ड रद्द होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

त्यानुसार नगर जिल्ह्यासह राज्यातील कार्यरत बीपीएल, अंत्योदय, अन्नपूर्णा, केशरी, शुभ्र व आस्थापना कार्ड या सर्व शिधापत्रिकांची तपासणी 1 फेब्रुवारी 2021 ते 30 एप्रिल 2021 या कालावधीत केली जाणार आहे. या आदेशानुसार कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य सरकारच्या पुरवठा विभागाने दिले आहेत.

राज्यातील बनावट/बोगस/अपात्र शिधापत्रिका शोधून रद्द करण्याकरिता राज्यात सन 2008, 2010 व 2011 मध्ये अपात्र शिधापत्रिका शोध मोहिम राबविण्यात आली होती.

सर्व शहरातील प्रत्येक शिधापत्रिका धारकांच्या शिधापत्रिकांची तपासणी करावी. यासाठी नमुना फांर्म वाटप केले जातील.रेशनकार्ड धारकांकडून माहिती भरून दिलेले फॉर्म स्विकृत करून अर्जदारास स्वाक्षरी व दिनांकासह पोच द्यावी. छाननी केल्यानंतर पुरेसा पुरावा असलेल्यांची यादी गट अ म्हणून करावी. तर गट ब मध्ये पुरावा न देणारांची यादी करावी. गट अ मधील शिधापत्रिका पूर्ववत सुरू राहतील. गट ब मधील यादीतील शिधापत्रिका निलंबित करण्यात येणार आहे. अशा शिधापत्रिकेवर शिधावस्तू देण्याचे त्वरीत थांबविण्यात येणार आहे.