एसपी कार्यालयात विषारी औषध घेणार्‍यावर गुन्हा

एसपी कार्यालयात विषारी औषध घेणार्‍यावर गुन्हा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पोलिस अधीक्षक कार्यालयात विषारी औषध घेणारा दिगंबर संतराम शिंदे (वय 22, रा. लाडजळगाव, ता.शेवगाव) या तरूणावर भिंगार-कॅम्प पोलिस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे हे (दि.4) पोलिस अधीक्षक कार्यालयात सायंकाळी आले होते. त्यांनी पोलिस अधीक्षकांना भेटण्याचे ठरविले.

त्यावेळेस पोलिस अंमलदार रामनाथ बाबासाहेब शिरसाठ (वय 33, नेमणूक पोलिस मुख्यालय, नगर) यांनी पोलिस अधीक्षक हे कार्यालयांमध्ये नसून तुम्ही उपअधीक्षक (गृह) यांना भेटा असे सांगितले. त्यानंतर शिंदे याने अभ्यागत कक्षाच्या बाजूला असलेल्या बाकड्यावर बसून पिवळ्या रंगाची रोगरची बाटली (बँगो एक्स रोगर 505) मधील विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com