एमआयआरसी मधील जवानांनी देशनिष्ठेची घेतली शपथ

36 आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण
एमआयआरसी मधील जवानांनी देशनिष्ठेची घेतली शपथ

अहमदनगर|Ahmedagar

36 आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून मेकॅनाइज्ड इन्फंन्ट्री रेजिमेंटल सेंटरमधील (एमआयआरसी) जवानांनी गुरुवारी देशनिष्ठेची शपथ घेतली. देशरक्षणाची व त्यासाठी आपले सर्वस्व समर्पित करण्याचा संकल्प जवानांनी केला. करोनाच्या अनुषंगाने असणारी नियमावली पाळत येथील अखौरा ड्रिल मैदानावर हा शपथग्रहण सोहळा झाला.

भारतीय लष्करातील महत्त्वाची प्रशिक्षण संस्था म्हणून येथील एमआयआरसी ओळखली जाते. एमआयआरसीमधून नुकतेच 36 आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जवानांनी देशनिष्ठेची तसेच एक प्रामाणिक सैनिक बनण्याची शपथ घेतली. लष्कराच्या बँडपथकाने सादर केलेल्या धूनवर जवानांचे मैदानावर आगमन झाले. यासर्वांची मुख्य सलामी एमआयआरसीचे कमांडंट ब्रिगेडिअर व्ही. एस. राणा यांनी स्वीकारली. धर्मगुरुंनी जवानांना कर्तव्यासाठी निष्ठा व समर्पणाची शपथ दिली. त्यानंतर प्रशिक्षणादरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या जवानांचा ब्रिगेडिअर राणा यांच्या हस्ते पदक देऊन सन्मान करण्यात आला. रिक्रूट हेमंत बिष्ट यांनी प्रशिक्षणादरम्यान उत्कृष्ट कामगिरी केल्याने त्याना बेस्ट रिक्रूटफसाठी दिले जाणारे जनरल सुंदरजी गोल्ड मेडल देऊन गौरवण्यात आले. तर, रिक्रूट निरज शर्मा आणि रिक्रूट कविंदर पालायाल यांना अनुक्रमे जनरल के. एल. डिसूजा सिल्वर मेडल व जनरल पंकज जोशी यांना कांस्यपदक देऊन सन्मानित करण्यात आले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com