श्रीराम चौकातून पुण्याकडे धावली बस

श्रीराम चौकातून पुण्याकडे धावली बस

अहमदनगर | प्रतिनिधी

राज्य परिवहन महामंडळाने सावेडीतील प्रवाशांच्या सोयीसाठी श्रीराम चौक ते पुणे या बससेवेचा प्रारंभ केला आहे. आमदार संग्राम जगताप यांनी या बससेवेला हिरवी झेंडी दाखवली.

सावेडीतून पुणे येथे कामानिमित्त जाणार्‍या प्रवाशांना या बससेवेचा लाभ होणार आहे. सावेडीतील श्रीराम चौक, एकविरा चौक, भिस्तबाग चौक, प्रोफेसर कॉलनी चौक, प्रेमदान चौक, पत्रकार चौक, तारकपूर ते पुणे अशी ही बस धावणार आहे. सावेडी उपनगर हे शहराचे सर्वात मोठे उपनगर झाले आहे. या ठिकाणी मोठी लोक वस्ती निर्माण झाली आहे. नागरिकांच्या दळणवळणासाठी ही बससेवा उपयुक्त ठरणार आहे. बस सेवा सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे वैभव ढाकणे यांनी पाठपुरावा केला, असे असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते, नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे, निखिल वारे, सुनील त्रिंबके, बाळासाहेब पवार, विद्यार्थी संघटनेचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे, अजिंक्य बोरकर, एस.टीचे विभाग नियंत्रक विजय गीते, डेपो मॅनेजर आघाव, शारदाताई लगड, संतोष ढाकणे, गणेश गोरे, राहुल सांगळे, बंटी हिवाळे, योगेश ठुबे, सतीश बारस्कर, शिवाजी पालवे, योगेश पिंपळे, शामराव गोरे, आसाराम निमसे, थोटे काका, राहुल घाणेकर, गणेश उभेदळ, रवी नाईकवाडे, प्रज्वल सोरटे तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.

सकाळी 7

श्रीराम चौकातून सकाळी सात वाजता बस निघेल. उपनगरातील विविध भागातून प्रवाशी घेत ही बस पुणे येथे सकाळी 11 वाजता पोहचणार आहे. नंतर ही बस पुणे येथून नगरकडे रवाना होऊन परत श्रीराम चौकात येणार आहे, असे एस.टीचे विभाग नियंत्रक विजय गीते यांनी सांगीतले.

Related Stories

No stories found.