राष्ट्रवादीच्या दबावामुळे कदमांनी सावित्रीबाई फुलेनगर फलक टाळला; मनसेचा आरोप

दोन दिवसात पदाधिकाऱ्यांना भेटणार
राष्ट्रवादीच्या दबावामुळे कदमांनी सावित्रीबाई फुलेनगर फलक टाळला; मनसेचा आरोप

अहमदनगर (प्रतिनिधी)

सारसनगर (Sarasnagar) भागाला सावित्रीबाई फुले नगर (Savitribai Fhule Nagar) असे नामकरण करण्याचा विषय २०१७ मध्ये मंजूर झालेला असताना राष्ट्रवादीच्या (NCP) दबावात महापालिकेत सत्ता असताना शिवसेनेने (Shivsena) असा फलक अद्याप लावलेला नाही. यासाठी शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम (Sambhaji Kdama) जबाबदार आहेत, असा आरोप मनसेचे (MNS) नितीन भुतारे (Nitin Bhutare) यांनी केला आहे.

महापुरुषांचा अवमान करण्याची सवय शिवसेनेला आहे. राष्ट्रवादीप्रमाणे जातीपातीचे राजकारण करण्याची पद्धत शिवसेनेने जोपासली आहे, असा आरोपही त्यांनी केला. २७ डिसेंबर २०१७ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सारस नगर भागाला सावित्रीबाई फुले नगर असे नामकरण करा या मागणीसाठी आंदोलनं केले.

त्यांनतर हा विषय महानगरपालिका महासभेत ३० डिसेंबर २०१७ रोजी मंजुर झाला. त्यानंतर आजपर्यंत शिवसेना महानगरपालिकेत सत्तेत असताना देखील त्या भागाला सावित्रीबाई फुले नगर नावाचा फलक लावण्यात आला नाही. विषेश म्हणजे त्यावेळी संभाजी कदम यांच्या सौभाग्यवती सुरेखा कदम शहराच्या महापौर होत्या. महासभेत ठराव मंजूर होऊन देखील त्यावेळी शिवसेनेने हा नामफलक लावला नाही. राष्ट्रवादीच्या दबावामुळे फलक शिवसेनेने लावला नाही. आजही शिवसेना सत्तेत असताना हा नामफलक लावला जात नाही, असा आरोप त्यांनी केला.

दोन दिवसांत मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ व शहराध्यक्ष गजेंद्र रशिनकर यांच्या नेतृत्त्वात मनसेचे शिष्टमंडळ सावित्रीबाई फुले नगर नावाचा फलक लावावा यासाठी शिवसेनेच्या महापौर तसेच पालिका आयुक्त, उपमहापौर, महिला बालकल्याण समितीच्या सभापती, उपसभापती यांची भेट घेऊन मागणी करणार असल्याचे त्यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Related Stories

No stories found.