अहमदनगर (प्रतिनिधी) - महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे महापौर शिवसेना नगरसेवकांना निधी देण्यात दुजाभाव करत असल्याच्या तक्रारी शिवसेना नगरसेवकांनी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यासमोर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्या. सर्व नगरसेवकांना निधी देतो, दुजाभाव करत नाही, अशी सारवासारव महापौर वाकळे यांनी केली.

महापौरांनी नव्या निधीची मागणी केल्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे, माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी आहे त्या निधीची योग्य विल्हेवाट लावा अशी मागणी करत महापौरांना तोंडघशी पाडले. शहरातील रस्त्यांची अवस्था दैनिय झाली असून मंत्री महोदयांनी पायी गणपती मंदिरापर्यंत रपेट केली तरी ते दिसेल. निधी न देता योजनांचा पाठपुरावा करावा अशी मागणी बोराटे यांनी केली. शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी महापौर वाकळे हे शिवसेना नगरसेवकांना निधी देत नसल्याच्या तक्रारीला तोंड फोडले. त्यानंतर दत्ता जाधव, अनिल बोरुडे, मदन आढाव, गणेश कवडे यांनी सातपुते यांच्या सुरात सूर मिळविले. स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर यांनीही शिंदे यांच्याकडे निधीची मागणी केली.

नगरसेवक अनिल शिंदे यांनी प्रशासनाच्या तकक्रारी केल्या. प्रशासनला कोणतेही गांभीर्य नाही. प्रशासनावर अंकुश ठेवावा.त्यासदंर्भात कोणतेही नियोजन नसल्याचे ते म्हणाले. माजी शहर प्रमुख संभाजी कदम यांनी पिंपळगाव माळवी येथील 700 एकर जागेवर मनोरंजन पार्क उभारावा तसेच उड्डाणपुलास स्व. अनिल राठोड यांचे नाव देण्याची मागणी केली.

हेरिटेजचा प्रस्ताव पाठवा

हेरिटेजबद्दल एक चांगला प्रस्ताव करा. आगामी काळात हेरिटेज सिटी म्हनून आपल्याला काहीतरी करता येईल, अशी सूचना नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी केली. फिल्म सिटी म्हणून 700 एकर परिसर विकसित करता येईल असा आशावाद व्यक्त करत पाठक यांनी तसा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले. तो प्रस्तावाचे टप्पे करावेत असेही त्यांनी सांगितले.