शिवसेना शहरप्रमुख शरद पवारांच्या भेटीला

राजकीय चर्चेला उधाण
शिवसेना शहरप्रमुख शरद पवारांच्या भेटीला

अहमदनगर | प्रतिनिधी

शिवसेना (Shivsena) अहमदनगर (Ahmednagar) शहर जिल्हा प्रमुखांनी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार (NCP Sharad Pawar) यांची भेट घेतल्याने नगरच्या राजकीय (Ahmednagar Politics) वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

उद्या शनिवारी शरद पवार (Sharad Pawar) हे नगर (Ahmednagar) जिल्हा दौऱ्यावर येत असताना त्यापूर्वीच झालेल्या या भेटीने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. सातपुते यांनी पवार यांच्याशी अर्धा तास चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

सातपुते हे केडगावचे (Kedgoan) हे रहिवासी आहेत. केडगावमध्ये यापूर्वी झालेल्या दोन शिवसैनिकांच्या खून प्रकरणात (Shivsena workers murder case) राष्ट्रवादीचे आमदारांचाही (NCP MLA) सहभाग असल्याचा आरोप केला गेला होता. या प्रकरणात सीआयडीचा तपास अजूनही सुरूच आहे. पवारांनी शहरातील कायदा सुव्यस्थेबाबत माहिती घेतल्याचे सातपुते यांनी सांगितले.

दिलीप सातपुते (Dilip Satpute) हे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप (NCP MLA Sangram Jagtap) यांचे कट्टर विरोधक म्हणून नगरमध्ये ओळखले जातात. अशा राजकीय परिस्थितीत सातपुते यांनी पवार यांची सदिच्छा भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Related Stories

No stories found.