केंद्रीय मंत्री दानवेंच्या फोटोला शिवसैनिकांनी फासले काळे

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा निषेध करत केली निदर्शने
केंद्रीय मंत्री दानवेंच्या फोटोला शिवसैनिकांनी फासले काळे

अहमदनगर (प्रतिनिधी) -

शिवसेनेच्यावतीने शनिवारी एसटी स्टॅण्ड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल व डिझेलच्या भाव वाढीचा

निषेध करून निदर्शने करण्यात आली. तसेच शेतकर्‍यांबद्दल अपशद्ब वापरल्याबद्दल केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रतिमेस शाई फेकून संताप व्यक्त करण्यात आला.

याप्रसंगी शहरप्रमुख दिलीप सातपुते, युवा सेना जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक अनिल शिंदे, बाळासाहेब बोराटे, योगिराज गाडे, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, गिरीश जाधव, संतोष गेनप्पा, प्रशांत गायकवाड, सचिन शिंदे, संग्राम कोतकर, शाम नळकांडे, दत्ता जाधव, रमेश परतानी, राजेंद्र भगत,महिला जिल्हाध्यक्षा आशा निंबाळकर, दीपक खैरे, अशोक दहिफळे, गौरव ढोणे, मुन्ना भिंगारदिवे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी सातपुते म्हणाले, केंद्र सरकार फक्त मोठ-मोठ्या घोषणा करत आहे, प्रत्यक्षात नागरिकांना त्याचा कोणताही लाभ होत नाही. केंद्र सरकार हे मुठभर उद्योगपतींच्या फायद्याचेच निर्णय घेत आहे. त्याचा परिणाम सर्वसामान्यांवर होत आहे, त्यामुळे महागाईमध्ये वाढ होत आहे. राठोड म्हणाले, शेतकरी आपल्या हक्कांसाठी सनदशिर मार्गाने आंदोलन करत असताना त्यांना चिनी-पाकिस्तान पुरस्कृत आंदोलन म्हणणारे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे खरे देशाचे शत्रू आहेत.

अन्नदात्याबद्दल त्यांनी वादग्रस्त वक्तव्य करून शेतकर्‍यांबरोबर सर्वसामान्य जनतेचाही अनादर केला आहे. यावेळी शिवसैनिकांनी पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ बैलगाडी आणून निषेध करण्यात आला. यावेळी केंद्र सरकार व मंत्री दानवे यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com