अहमदनगर (प्रतिनिधी) - शहरातील नामांकीत डझनभर डॉक्टरांनी एकत्र येत उभारलेले साईदीप हॉस्पिटल नगरच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरू पाहत आहे. या हॉस्पिटलमध्ये आजाराचे भविष्य सांगणारी अत्याधुनिक मशीनरी आली असून उपचारालाही सुरूवात झाली आहे. याशिवाय हॉस्पिटलने कॅन्सर उपचारालाही सुरूवात केल्याची माहिती हॉस्पिटलचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एस. एस. दीपक यांनी दिली.

नगर शहरातील नामांकित डॉक्टरांनी एकत्र येत ‘साईदीप’ हॉस्पिटलची उभारणी केली आहे. प्रशास्त इमारत आणि अत्याधुनिक सुविधा, स्वच्छता ही या हॉस्पिटलची वैशिष्ट्ये आहेत. दोन वर्ष पूर्ण करून तिसर्या वर्षात पर्दापन करताना हॉस्पिटलमध्ये कॅन्सर उपचार सुरू करण्यात आले आहे. कॅन्सर तज्ज्ञ आणि तीन सर्जन रुग्णांच्या आजाराचे निदान आणि उपचार करणार असून कॅन्सरचा समावेश महात्मा फुले जीवनदायी योजनेत केला जाणार असल्याचे डॉ. दीपक यांनी सांगितले.

आजाराची भविष्यवाणी सांगणारी वैद्यकीय क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान हॉस्पिटलमध्ये वापरास सुरूवात झाली आहे. आर्टिफिशीअल इंटिलिजन्स ही नवीन उपचार पध्दतीसोबतच एमआरआय मशीनही बसविण्यास प्रारंभ झाल्याचे संचालक डॉ. व्ही.एन.देशपांडे यांनी सांगितले. हृदयरोग, स्त्रीरोग, डोळे यासंदर्भातील आजाराची या मशीनद्वारे उपचारही सुरू झाले आहेत. आजाराचे निदान झाल्यानंतर ऑपरेशन करण्याची गरज भासल्यास काय धोके आहेत किंवा नाही याची माहिती आर्टिफिशीअल इंटेलिजन्स देणार आहे. हॉस्पिटलला वैदकीय पदवीत्तर कोर्सला मान्यता मिळाली आहे. नगरच्या मुलांना मेडिकल पोस्ट ग्रॅज्युएटसाठी तेथे संधी असेल अशी माहिती डॉ. निसार शेख यांनी दिली.

पेशंटची हिस्ट्री मोबाईलमध्ये

हॉस्पिटलमधील कोणत्या वार्डात कोणत्या खाटावर कोणता पेशंट आहे याची सगळी माहिती प्रत्येक डॉक्टरांच्या मोबाईलमध्ये दिसते. त्या पेशंटच्या नावावर क्लिक केल्यास त्याचा सगळा डाटा दिसतो. अॅडमीट ते उपचाराची स्टेज इथंपासून ते त्याने किती बिल भरले याचा सगळा तपशील दिसणारे तंत्रज्ञान हॉस्पिटलमध्ये असल्याचे डॉ. कैलास झालानी यांनी सांगितले.

मातृत्वाच्या आनंदाला अत्याधुनिक जोड

हॉस्पिटलमध्ये आयव्हीएफ ही मातृत्व देणारी उपचार पध्दती सुरू आहे. डॉ. वैशाली किरण यांच्या मार्गदर्शनाखाली आता आर्टिफिशीअल इंटेलिजन्सच्या माध्यमातून स्त्रियांच्या आजाराचे अचूक निदान व योग्य उपचार केले जाणार आहे. स्त्री-पुरूष बिजाचे शुध्दीकरण करून मातेला मातृत्वाचा आनंद दिला जातो. विशेष म्हणजे परपुरूषाच्या वीर्याचा वापर न करता मातेला हा आनंद दिला जात असल्याचे डॉ. वैशाली किरण यांनी सांगितले.

हॉस्पिटलने नॅशनल अॅक्रीडेशन बोर्ड ऑफ हेल्थ (एन.ए.बी.एच) संस्थेकडे नोंदणी केली आहे. या संस्थेकडून एनएबीएच फाईव्ह मानांकन मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. एनएबीएच फोर मानांकन मिळाले आहे. फाईव्ह मानांकन मिळाल्यास परदेशातील पेशंट नगरमध्ये येवून उपचार घेऊ शकतील. आताही परदेशातील काही नागरिक उपचारासाठी येतात. याशिवाय मुंबई,पुण्यातील पेशंटही साईदीपमध्ये उपचारासाठी येत असल्याची माहिती डॉ. किरण यांनी दिली.