PHOTO : सुगंधी रांगोळीचा ॲरोमा रंगनाथ पॅटर्न

PHOTO : सुगंधी रांगोळीचा ॲरोमा रंगनाथ पॅटर्न
Published on
2 min read

अहमदनगर (प्रतिनिधी)

अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारत उद्घाटनप्रसंगी उपक्रमशील शिक्षक डॉ. अमोल बागुल यांनी सुमारे ७० प्रकारच्या विविध सुगंधांतून तयार केलेल्या रंगांच्या रांगोळीचा ॲरोमा रंगनाथ पॅटर्न रेखाटला.

ॲरोमा रंगनाथ नामक सुगंधी रांगोळी रेखाटन या कला प्रकारासाठी कॉपीराइट, पेटंट, ट्रेडमार्क, आय.एस.ओ.आदी आंतरराष्ट्रीय मानांकनांसाठी डॉ. बागुल प्रयत्नशील आहेत.

या वास्तूचे उद्घाटन नुकतेच मान्यवर मंत्री महोदयांच्या हस्ते संपन्न झाले. रात्री १२ ते सकाळी १० या १० तासांमध्ये या नूतन वास्तूचे तब्बल तीन भव्य मजले डॉ. बागुल यांनी रांगोळीच्या सुगंधी रंगांनी सजवले.

४० बाय ४० फुटांची मुख्य थीम बेस्ड स्वागतम रांगोळी, बाहेरील पायऱ्यांच्या महालदार प्रवेशद्वारावर नगरच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक प्रतीकांची सुगंधी रंगांची रेखाटने डॉ. बागुल यांनी काढली.

डॉ.बागूल यांच्या रोमा रंगनाथ पॅटर्नमधील रोमा म्हणजे निसर्गोपचारातील रोमा चिकित्सा म्हणजेच गंधशास्त्र होय, विविध प्रकारचे वास सुवास व सुगंध आपल्याला प्रफुल्लित व प्रोत्साहित करतात.

याकरिता सौंदर्यप्रसाधनांमध्ये विविध सुगंध, अत्तर व फाया यांचा वापर केला जातो. रंगनाथ श्रीकृष्ण व विष्णू हे भारतीय संस्कृतीत रंगांचे जनक मानले जातात, म्हणून रंगनाथ हे नाव देण्यात आलेले आहे. त्यांच्या या प्रयोगाचे उपस्थित मंत्र्यांसह मान्यवरांनी कौतुक केले होते.

डॉ. बागुल यांच्या रांगोळीच्या आधीच्या असूबा पॅटर्नला केंद्र सरकारचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे. असूबा पॅटर्न देखील कॉपीराइट, पेटंट, ट्रेडमार्क, आय.एस.ओ. व जागतिक विश्वविक्रमाने प्रमाणित आहे. डॉ. बागुल यांनी सुमारे चौदा देशांमध्ये विविध सोहळ्याप्रसंगी रांगोळ्या काढलेल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com