अहमदनगर (प्रतिनिधी) -

नगर शहरातील माळीवाडा व पुणे बस स्थानका बाहेर प्रवाशांना लुटणार्या टोळ्या कार्यरत झाल्या

आहेत. प्रवाशांना कारमध्ये बसून त्यांना निर्जन स्थळी नेत मारहाण करत लुटमार केली जात असल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

लुटीच्या घटना वाढत असताना कोतवाली पोलिसांचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.

नगर शहरातील माळीवाडा, पुणे बस स्थानक परिसरात पुणे, नाशिक, बीड, औरंगाबाद जिल्ह्यासह जिल्ह्यातील इतर ठिकाणी प्रवास करण्यासाठी प्रवाशी बस किंवा खाजगी वाहनांची वाट पाहत थांबलेेले असतात. याचा फायदा रस्त्यावर लूट करणारे घेतात. बस स्थानकांच्या गेटवर कार उभी करायाची आणि प्रवाशाला कुठे जायचे असे विचार. तुम्हाला सोडतो असे म्हणत प्रवाशाला कार मध्ये बसवले जाते. ज्या वाहनात तो प्रवाशी बसला त्या वाहनात तीन ते चार अगोदर बसलेले असतात. ते प्रवाशी असल्याचे त्याला भासविले जाते. पुढे ते वाहन शहराच्या बाहेर निर्जन ठिकाणी घेऊन जात प्रवाशाला मारहाण केली जाते. बळजबरीने त्याच्याकडील पैसे, मोबाईल, एटीएम कार्ड काढून घेतले जाते. मोबाईलमधील फोन पे चा पासवर्ड विचारून त्यातील रक्कम ट्रान्सफर केली जाते.

मारहाण झालेला प्रवासी प्रचंड घाबरलेला असतो. त्याला त्याठिकाणी सोडून दिले जाते. प्रवासी पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद देतात. माळीवाडा बस स्थानक परिसरात अशा लुटीच्या घटना वारंवार होऊन देखील याकडे कोतवाली पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसते.

नगरहून आष्टी येथे जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशाला कारमध्ये बसवून सारोळा शिवारात घेऊन जात त्याला लोखंडी रॉडने मारहाण केली. महेश भाऊसाहेब गव्हाणे (रा.आष्टी जि. बीड) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्याकडील सोन्याच्या अंगठ्या, घड्याळ, मोबाईल असा 40 हजारांचा ऐवज लुटून नेला आहे. गव्हाणे यांनी कोतवाली पोलिस ठाणे गाठात घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितले. या प्रकरणी पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे.