चायनीज मोबाईल कंपनीविरोधात रिटेलर्स संतप्त

कंपनीच्या ऑनलाईन व्यापार धोरणाला ऑल इंडिया मोबाईल संघटनेचा विरोध
चायनीज मोबाईल कंपनीविरोधात रिटेलर्स संतप्त

अहमदनगर | प्रतिनिधी

चायनीय मोबाईल कंपन्यांनी (Chinese mobile company) सरकारचे नियम (Government rules) डावलून सुरू केलेल्या व्यापार धोरणाविरोधात मोबाईल रिटेलर्सने (Mobile retailers) संताप व्यक्त केला आहे. शाओमी कंपनीच्या (Xiaomi Company) धोरणामुळे पार्टनर मोबाईल रिटेलर्स व अन्य रिटेलर्सची फसवणूक सुरू आहे, असा आरोप ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशनने (All India Mobile Retailers Association) केला आहे. नगर (Ahmednagar) शहरातही कंपनीचे अनेक रिटेलर्स आहेत.

चायनीज मोबाईल कंपनीविरोधात रिटेलर्स संतप्त
आयटी पार्कच्या नावे आमदारांकडून गंडा

ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशनचे (All India Mobile Retailers Association) राष्ट्रीय जॉइंट सेक्रेटरी नवनीत पाठक यांनी कंपनीच्या सिनियर डायरेक्टरांना (Xiaomi Senior Director) पत्र पाठवून आपल्या तीव्र भावना कळविल्या आहेत. सध्या कंपन्यांनी देशात पार्टनर्स रिटेलर्सची नियुक्ती केली आहे. शाओमीने (Xiaomi) नगरमध्येही अनेक रिटेलर्स नेमले आहेत. या चाजनीज कनपनीचे देशभरातील 20 हजारांहून अधिक पार्टनर मोबाईल रिटेलर्सची आहेत. भारतात गेल्या काही काळापासून ऑनलाईनचे प्रस्थ वाढत आहेत. अनेक परकीय कंपन्या एफडीआयचे (FDI) नियम डावलून मोबाईल रिटेलर्सची पिळवणूक करीत आहेत.

ऑनलाईन व ऑफलाईन प्लॅटफॉर्मवर (Online and offline platforms) सारख्या प्रमाणात माल उपलब्ध करून देण्याऐवजी कंपनी फक्त ऑनलाईन प्लॅटफॉर्मला प्राधान्य देत आहे. त्यामुळे कंपनीसमवेत पार्टनर म्हणून जोडले गेलेल्या रिटेलर्सच्या व्यवसायावर नकारात्मक परिणाम झाला आहे. कंपनीने तातडीने आपल्या व्यापार धोरणात बदल करण्याची मागणी ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशनने केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com