अहमदनगर (प्रतिनिधी) - रेखा जरे आपल्या विरोधात गुन्हा दाखल करतील अशी भिती बोठेला होती. गुन्हा दाखल झाल्यास आपली बदमानी होईल असे त्याला वाटत होते. त्यातूनच त्याने रेखा जरे यांची हत्या करण्याचा प्लॅन केला. तो प्लॅन त्यानेच केला होता, याची खातरजमा झाल्याचे एसपी पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पोलिसांचा तपास अजून सुरूच असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे आणखी काही कारण पुढे येते की काय, याची उत्सुकता नगरकरांना लागून आहे.

दिल्ली, पंजाब, छत्तीसगडमध्येही झाडाझडती...

बोठेला अटक करण्यासाठी नगर पोलिसांनी जिगरबाज तपास सुरू केला होता. खबर्याकडून मिळालेल्या प्रत्येक माहितीची खातरजमा केली जात होती. त्यातूनच नगर पोलिसांनी राज्यासह परराज्यात शंभरापेक्षा जास्त ठिकाणी त्याच्या अटकेसाठी झाडाझडती घेतली. दिल्ली, पंजाब, भटींडा, चंदीगड, छत्तीसगड, रायपूर, भोपाळलाही पोलिसांनी त्याचा शोध घेतला.

उस्मानिया... जान पहेचान

बोठेकडे डझनभर डिग्री आहेत. त्यातील एक डिग्री त्याने उस्मानियॉ विद्यापीठातून घेतली होती. त्यामुळे त्याला हैदराबादची चांगली माहिती होती. तेथील प्राध्यापकही त्याच्या चांगल्या परिचयाचे होते. त्यांच्याच मदतीने तो हैदराबादमध्ये दडून बसला होता. याच विद्यापाठात बोठे याची ये-जा असल्याने त्याला तेथील माहिती होती.

या अधिकार्यांसह पोलिसांनी केली मोहीम फत्ते...

बाळ बोठेला अटक करण्याची मोहीम फत्ते करण्यामध्ये कर्जतचे पीआय संभाजी गायकवाड, जामखेडच्या महिला पीआय गडकरी, नगरचे एपीआय सानप, मिथून घुगे, एलसीबीचे दिवटे, तोफखान्याचे पीएसआय समाधान सोळंके, हवालदार रविंद्र पांडे, पोलीस नाईक रविकिरण सोनटक्के, दीपक शिंदे, राहुल गुंडू, अभिजीत अरकल, जयश्री फुंदे, संतोष गोर्डे, गणेश धुमाळ, भुजंग बडे, सचिन वीर, सत्यम शिंदे, चौघुले, मिसाळ, सानप, रणजित जाधव, बुगे, जाधव, दातीर, प्रकाश वाघ, राहुल डोळसे, हितेश वेताळ या पोलिसांचा समावेश आहे. एसपी मनोज पाटील यांनी एएसपी सौरभ आगरवाल, तपासी अधिकारी अजित पाटील, एलसीबीचे अनिल कटके यांच्यासह या तपास पथकाचे कौतूक केले.