सीना नदीच्या पूर नियंत्रण रेषचे फेर सर्वेक्षण आदेश

जलसंपदा मंत्र्यांकडून आढावा : पात्रातील अतिक्रमणे काढण्याच्या सूचना
सीना नदीच्या पूर नियंत्रण रेषचे फेर सर्वेक्षण आदेश

अहमदनगर | प्रतिनिधी

सीना नदीच्या पूर नियंत्रण रेषेचे फेर सर्वेक्षण (Re-survey of Sina River flood control line) करण्याचे आदेश जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Water Resources Minister Jayant Patil) यांनी जिल्हा प्रशासनाला (district administration) दिले आहेत.

सीना पात्रातील (Sina River) अतिक्रमणे (Encroachments) काढावी. नदीपात्राचे खोलीकरण व रुंदीकरण करावे व सीना नदी सुशोभिकरनासाठी निधीसाठी पाठपुरावा करावा, अशा सूचनाही दिल्याचे मंत्री पाटील यांनी सांगीतले. बुधवारी जलसंपदा मंत्री जयंत पाटील नगर दौर्‍यावर (Water Resources Minister Jayant Patil in Ahmednagar) आहेत. त्यांनी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

आ.संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) यांनी राज्य शासनाकडे सीना नदीचे पूर नियंत्रण रेषेचे फेर सर्वेक्षण करण्याची मागणी केली होती. बुधवारी जलसंपदा मंत्री जयंत पाटील नगर दौर्‍यावर आहेत. जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत त्यांनी या विषयावर आढावा घेत सूचना केल्या. मंत्री पाटील यांनी सीना नदी पात्राची पाहणी केली.

यावेळी त्यांच्यासमवेत आ.संग्राम जगताप, आ.डॉ.किरण लहामटे, माजी आ.नरेंद्र घुले, उपमहापौर गणेश भोसले, मनपा आयुक्त शंकर गोरे, स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, माजी विरोधी पक्षनेता संजय शेंडगे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, नगरसेवक सचिन शिंदे, नगरसेवक श्याम नलकांडे आदी उपस्थित होते.

यावेळी आ.जगताप म्हणाले यांनी सविस्तर माहिती दिली. सीननदी पूर रेषाचे फेर सर्वेक्षण करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला होता. याच पार्श्वभूमीवर आज जलसंपदा मंत्री जयंत पाटील नगर शहराच्या दौर्‍यावर आले असता जिल्हा प्रशासनास पुन्हा फेर सर्वेक्षण करा असा आदेश देऊन नदी पात्राची पाहणी केली तसेच सीना नदीचा उगम नगर शहरा जवळच होत आहे. 50 वर्षात कधीही सीना नदीला महापूर आला नाही व कुठल्याही प्रकारची वित्तहानी झाली नाही.सध्या सीनानदी ची पूररेषाचे अंतर 500 मीटर असल्याने शहर विकासाला गती देण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे. याच बरोबर नागरिकांना विविध अडचणीला सामोरे जावे लागते, यासाठी सीना नदी पात्राचे पुनर सर्वेक्षण होणे गरजेचे आहे जेणे करून नगर शहरातील 25 ते 30 टक्के नागरिकांना या सर्वेक्षणाचा लाभ होईल याच बरोबर सीना नदी पात्राचे खोलीकरण करून पात्रा भोवती असलेले अतिक्रमण काढावे असे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.