रेशनवर मोफत डाळ
सार्वमत

रेशनवर मोफत डाळ

Arvind Arkhade

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेतंर्गत व सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतंर्गत पात्र लाभार्थ्यांना जुलै ते नोव्हेंबर 2020 या पाच महिन्यांच्या कालावधीसाठी हरभरा ऐवजी चणाडाळ नियमित धान्यासोबतच प्रति महिना प्रती कार्ड 1 किलो मोफत वाटप केली जाणार आहे.त्यामुळे जिल्हाभरातील लाखो रेशनकार्ड धारकांना दिलासा मिळाला आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात आणि राज्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात एकही नागरिक उपाशी राहू नये यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाच्यावतीने विविध योजना राबविण्यात येत असून अन्नधान्याचे वाटप करण्यात येत आहे.

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत राज्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना यापूर्वी तीन महिन्यासाठी प्रती व्यक्ती 5 किलो मोफत तांदूळ देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याचे वाटप नियमित करण्यात येत आहे. त्याचपार्श्वभूमीवर या लाभार्थ्यांना तीन महिन्यांसाठी मोफत डाळ वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील पात्र रेशनकार्ड धारकाने नियमित स्वस्त धान्य खरेदी केल्यानंतर, कार्ड धारकाला 1 किलो चणाडाळ मोफत देण्यात येणार आहे. यासाठी केंद्र शासनाकडून जिल्ह्याला प्रती माह 681 मेट्रिक टन चणाडाळ उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ राज्यातील 7 कोटी लाभार्थ्यांना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com