सीएला 50 लाखांची खंडणी मागणारा अटकेत

नगर एलसीबीची पुण्यात कारवाई
सीएला 50 लाखांची खंडणी मागणारा अटकेत

अहमदनगर (प्रतिनिधी) - चार्टर्ड अकाऊंटकडे 50 लाखाची खंडणी मागणार्‍या बहाद्दराला एलसीबी पोलिसांनी पुण्यातून अटक केली. कोर्टाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे.

राहूल सुखदेव गायकवाड (रा.कोहकडी, पारनेर) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने गावातीलच सीए गणेश सिताराम गायकवाड यांना धमकी देत 50 लाखाची खंडणी मागितली होती. कोहकडीमधील माळवडी वस्ती येथील गायकवाड हे चार्टर्ड अकाऊंटअसून ते जमिन खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. 14 मार्च ते मार्च या कालावधीमध्ये गणेश गायकवाड यांना अनोळखी व्यक्तीने वेळोवेळी फोन करुन ‘जिंदगी सहीसलामत जिना चाहते है , तो पचास लाख रुपये देना ही पडेगा, पुलीस के पास गया तो , तेरी जान सौ टका जायेगी’ अशी फोनवरुन जिवे ठार मारण्याची धमकी देत 50 लाखाची खंडणी मागितली.

गणेश गायकवाड यांनी 19 मार्चला सुपा पोलिसांत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्याचे गांर्भीय लक्षात घेवून एसपी मनोज पाटील यांनी तपास एलसीबीकडे हस्तांतरीत केला. पीआय अनिल कटके,एपीआय सोमनाथ दिवटे, सहाय्यक फौजदार नानेकर, हवालदार विश्वास बेरड, सुरेश माळी, रवि सोनटक्के, रणजित जाधव, रविन्द्र धुंगासे, मेघराज कोल्हे, प्रकाश वाघ, सागर ससाणे, मयूर गायकवाड, विजय धनेधर, मच्छिन्द्र बर्डे, चालक चंद्रकांत कुसळकर यांच्या पथकाने अहोरात्र मेहनत घेवून गुप्त खबर्‍याकडून माहिती काढली. खंडणी मागणारा राहूल गायकवाड याला पुणे येथून सापळा लावून ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्हा केला असल्याची कबुली दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com