सीसीटीएनएस प्रणालीत नगरचा राज्यात तिसरा क्रमांक

सीसीटीएनएस प्रणालीत नगरचा राज्यात तिसरा क्रमांक

अहमदनगर (प्रतिनिधी) - जिल्हा पोलीस दलाने क्राईम अ‍ॅण्ड क्रिमिनल ट्रेकिंग नेटवर्क सिस्टिममध्ये (सीसीटीएनएस प्रणाली) केलेल्या उत्कृष्ट कामकाजासाठी नगरला राज्यात तिसरा क्रमांक मिळाला आहे.

2015 पासून राज्य पोलीस दलात सीसीटीएनएस प्रणाली कार्यन्वित करण्यात आली आहे. या प्रणालीत एक ते 21 फॉर्मची विभागणी केलेली आहे. यामध्ये होणार्या कामकाजासाठी गुण दिले जातात.

मार्च 2021 मध्ये गुन्हे अन्वेषण विभागाने अपर पोलीस महासंचालक यांच्या गुणांकानुसार राज्यातील 48 युनिटमधून नगरला तिसरा क्रमांक मिळाला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली हे कामकाज चालते.

या उत्कृष्ट कामगिरीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर अधीक्षक सौरभ अग्रवाल, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी सीसीटीएनएस विभागातील सहायक फौजदार आर. डी. बारवकर, एस. एस. जोशी, ए. के गोलवड, पोलीस नाईक आर. व्ही. जाधव, एस. एस. काळे, के. पी ठुबे, एस. ए. भागवत, टी. एल. दराडे यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com