सहा तालुक्यात सरासरीच्या 100 टक्के पाऊस

जिल्ह्याची सरासरी 92 टक्के सर्वात कमी श्रीरामपूर तालुक्यात
सहा तालुक्यात सरासरीच्या 100 टक्के पाऊस

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अहमदनगर जिल्ह्यात मागील काही चांगलाच पाऊस सुरु आहे. मागील दहा दिवसांत जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. जिल्ह्यात जून ते सप्टेंबर अखेरपर्यंत सरासरीच्या 92 टक्के पाऊस झाला. तर नाशिक डिव्हिजनमध्ये 77.9 टक्के पाऊस झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. यात सहा तालुक्यांत सरासरीच्या शंभर टक्के किंवा त्याहून अधिक पाऊस झाला असून सर्वात कमी पावसाची टक्केवारी श्रीरामपूर तालुक्यात अवघी 47.2 टक्के आहे.

अहमदनगरमध्ये गणेशोत्सावच्या दुसर्‍यादिवशी गुरूवार (दि.21) पासून पावसाला सुरूवात झाली. यात काही तालुक्यांत अतिवृष्टी झाली. हा पाऊस जिल्ह्यात सर्वदूर असल्याने खरीप हंगामातील पिकाला जीवनदायी ठरला आहे. या पावसाने रब्बी हंगामातील पिकांची सोय झाली. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास शेतकर्‍यांसह नागरिकांचा पाण्याचा प्रश्न देखील सुटणार आहे. जिल्ह्यात मागील दहा दिवसांपासून अनेक भागात दमदार पाऊस हजेरी लावत आहे. दक्षिणेतील नगर, पारनेर, श्रीगोंदा, शेवगाव, पाथर्डी आणि उत्तरेतील अकोले तालुक्यात सरासरीच्या 100 टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.

तालुकानिहाय टक्केवारी (जून ते सप्टेंबर)

नगर-110.1, पारनेर-116.3, श्रीगोंदा-110.6, कर्जत-92, जामखेड-91.3, शेवगाव-100.3, पाथर्डी-104.1, नेवासे-85.8, राहुरी-63.4, संगमनेर-81.8, अकोला-104.1, कोपरगाव-71.2, श्रीरामपूर-47.2, राहाता-72.8 तालुक्याच्या सरासरीच्या तुलनेत झालेला पाऊस.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com