पावसाची धुमश्‍चक्री, आणखी दोन दिवस यलो अर्लट

खरीप हंगामातील पिकांची स्थिती गंभीर
पावसाची धुमश्‍चक्री, आणखी दोन दिवस यलो अर्लट

अहमदनगर (प्रतिनिधी)

जिल्ह्यात परतीच्या पावसाचा घमासान सुरू आहे. अनेक भागात शुक्रवारी पुन्ह मुसळधार पाऊस झाला असून या पावसामुळे खरीप हंगामातील सोंगणीसाठी तयार असणार्‍या पिकांची स्थिती गंभीर झाली आहे.

दुसरीकडे भारतीय हवामान विभागाने रविवार (दि.16) आणि सोमवार (दि.17) रोजी पावसाचा पुन्हा यलो अर्लट जारी केला आहे. यामुळे शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

जिल्ह्यात जूनपासून आतापर्यंत 547 मिली मीटर पावसाची नोंद झाली असून त्याची टक्केवारी ही 118.6 टक्के झाली आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांत पडणार्‍या पावसामुळे खरीप हंगामातील काढणीला आलेल्या पिकांची तर रब्बी हंगामात पेरणी होणार्‍या पिकांची स्थिती गंभीर झाली आहे. काढणीसाठी असलेली पिके सध्या पाण्यात असून यामुळे शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात 97 महसूल मंडलापैकी 61 महसूल मंडलात अतिवृष्टी झालेली आहे. यामुळे शेती आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. शुक्रवारी नगर शहर आणि तालुक्यात दुपारी एकनंतर मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्याच्या अनेक भागात शुक्रवारी ढगफुटी सदृष्य पाऊस झाला असून यामुळे शेतकर्‍यांसह सर्वांची अडचण झाली आहे.

त्यात भारतीय हवामान विभागाने रविवार (दि.16) आणि सोमवार (दि.17) रोजी पावसाचा पुन्हा यलो अर्लट जारी केला आहे. या दोन दिवसांत जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा मात्र ढगांच्या गडगटात पाऊस होण्याची शक्यता असून यामुळे शेती पिकांचे अजून नुकसान होणार आहे. यात सर्वात जास्त नुकसान हे सोयाबीन पिकांचे झाले असून अनेक ठिकाणी हे पिका शेतात सडले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com