मालधक्का विळदला हलविण्याचा प्रयत्न कामगारांनी हाणून पाडला

कमी दरात काम करण्यास कामगारांचा नकार
मालधक्का विळदला हलविण्याचा प्रयत्न कामगारांनी हाणून पाडला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर रेल्वे स्थानकावरील मालधक्का विळद (ता. नगर) येथे हलविण्याचा प्रयत्न तात्पुरता का होईना कामगारांनी हाणून पाडला आहे. सोमवारी सकाळी अचानक विळद येथे काम सुरू झाल्यानंतर कामगारांनी तेथे धाव घेऊन काम करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे ठेकेदारांची गोची झाली. कमी दरात काम करण्यास कामगारांनी नकार दिल्याने माथाडी बोर्डात सायंकाळी बैठक होऊन विळद येथे मालधक्का हलवण्यासाठी स्थगिती देण्यात आल्याची माहिती नगरसेवक प्रशांत गायकवाड यांनी दिली.

रेल्वे स्थानकावरील कामगार व माल धक्क्यावरील ठेकेदारांमध्ये मागील वर्षभरापासून दरवाढीवरून वाद आहेत. अशातच सोमवारी सकाळी अचानक विळद येथे माल उतरविण्याचे काम सुरू झाले. त्यामुळे कामगारांनी तिथे धाव घेतली. आंदोलन न करता तिथेच काम करण्याची भूमिका घेत कर्मचार्‍यांनी ठेकेदाराची गोची केली. मात्र येथे कमी दारात काम करावे लागेल, असे ठेकेदारांकडून सांगण्यात आल्याने कर्मचार्‍यांनी काम थांबवले.

सायंकाळी माथाडी बोर्डात सहाय्यक कामगार आयुक्त नितीन कवले यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले, नगरसेवक गायकवाड, मुकादम, ठेकेदार उपस्थित होते. मालधक्क्यावरील कामगारांसंदर्भात पुढील निर्णय होईपर्यंत रेल्वे स्थानकावरील मालधक्क्यावरच काम होईल, तूर्तास विळद येथील मालधक्क्याला स्थगिती देण्यात आल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com