अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी युवक ठार

अहमदनगर - पुणे महामार्गावर पळवे शिवारात घटना
अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी युवक ठार

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

अहमदनगर-पुणे महामार्गावर (Ahmednagar-Pune Highway) पळवे खु शिवारात आज्ञात भरधाव वहानाच्या धडकेत (Accident) एका अनोळखी पादचाराचा मृत्यू (Death) झाल्याची  घटना शनिवारी रात्री  घडली. धडक देणारा वाहन चालक फरार झाला आहे.

अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी युवक ठार
अकलापूर शिवारात दिव्यांग तरुणीवर अत्याचार

याबाबत राहुल लक्ष्मण तरटे यांनी सुपा पोलिस स्टेशनला (Supa Police Station) दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे  की, शनिवार (दि. 8) रात्री 11.30 वाजेच्या दरम्यान अहमदनगर पुणे महामार्गावर (Ahmednagar-Pune Highway) पळवे खुर्द (Palave Khurd) गावच्या शिवारात पळवे फाटा येथे एका अज्ञात भरधाव वाहनाने रस्ता ओलांडणार्‍या एका पादचाराला धडक दिल्याने पादचार्‍याचा जागीच मृत्यू (Death) झाला आहे. घटनेची माहिती कळताच सुपा पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा अंदाजे 25 वर्षे वय असलेल्या युवकास अज्ञात वाहनाने धडकेत जबर जखमी केल्याने पादचार्‍याचा जागीच मृत्यू (Death) झाला होता.

सुपा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह सरकारी रुग्णालयात पुढील सोयसकर पुर्ण करण्यासाठी पाठवला. मृत युवकाची अंगकाठी सडपातळ, रंग निमगोरा असुन उंची 5.5 आहे. त्याच्या अंगावर काळी जीन्स पँट व काळ्या रंगाचा टि शर्ट, राखाडी कलरचा बनियन आहे. या वर्णनाच्या कुणी व्यक्ती बेपत्ता आसल्यास नातेवाईकांनी सुपा पोलीस स्टेशनशी  चौकशी करावी असे अवाहन सुपा पोलिसांनी (Supa Police) केले आहे.

अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी युवक ठार
शासकीय, खासगी कार्यालयात तंबाखूजन्य पदार्थ वापरावर बंदी
अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी युवक ठार
20 हजार मानधनावर होणार सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com