महामार्गावर 25 ठिकाणी अनधिकृतपणे फोडले दुभाजक

हॉटेलचालक, पेट्रोलपंप चालकांची मनमानी
महामार्गावर 25 ठिकाणी अनधिकृतपणे फोडले दुभाजक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर-पुणे महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले असून विविध कारणांसह विना परवानगी अनधिकृतपणे फोडलेले दुभाजक हेही अपघातांचे प्रमुख कारण मानले जात आहे. जिल्ह्यातील हद्दीत नगर ते शिरूर या 55 किलोमीटरच्या महामार्गावर 25 पेक्षा अधिक ठिकाणी हॉटेल चालक, पेट्र्रोलपंप चालक यांनी मनमानीपणे दुभाजक फोडले असल्याचे वास्तव अधिकार्‍यांच्या पाहणीत समोर आले आहे.

नगर-पुणे महामार्गाचे नव्याने काम करताना महामार्ग प्राधिकरण, तसेच संबंधित यंत्रणांनी या मार्गावरील गावे, जवळील गावे, महामार्गावरून त्यांना जोडणारे मार्ग, चौफुली अशी सर्व पाहणी करून त्या त्या ठिकाणी योग्य पद्धतीने चौक तयार केले आहेत. अशा ठिकाणी महामार्गावरून जाणार्‍या वाहन चालकांच्या लक्षात यावे, यासाठी वाहतुकीच्या खुना, चिन्ह, मार्गदर्शक फलक, सिग्नल, गतिरोधक, झेब्रा क्रॉसींग असे बनवण्यात आले आहेत. तर यानंतर उर्वरीत सर्व ठिकाणी रस्ता दुभाजक बनवण्यात आला आहे.

दुभाजक फोडण्यास राजकीय पाठबळ

महामार्गावरील अनेक हॉटेल व पेट्रोलपंप हे राजकारण्यांचे, त्यांच्या कार्यकर्ते तसेच नातेवाईकांचे आहेत. राजकारण्यांचाच आधार असल्याने अधिकारी अथवा संबंधित कंपनीचे कर्मचार्‍यांना गप्प बसावे लागत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com