ट्रकची दुचाकीला जोराची धडक; एक ठार

नगर-पुणे महामार्गावर घडली घटना
ट्रकची दुचाकीला जोराची धडक; एक ठार

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

अहमदनगर-पुणे महामार्गावर (Ahmednagar-Pune Highway) सुपा (Supa) येथे हॉटेल लोकसेवा (Hotel Lokseva) जवळ दुचाकीला (Bike) ट्रकचा (Truck) कट बसल्याने झालेल्या अपघातात (Accident) नगर येथील व्यक्ती जागीच ठार (Death) झाली आहे.

ट्रकची दुचाकीला जोराची धडक; एक ठार
वर्गात आढळली आंतरवस्त्रे व कंडोम पाकिटे

याबाबत माहिती अशी की, शनिवारी सायंकाळी चार ते पाच वाजण्याच्या दरम्यान सुपा (Supa) येथील हॉटेल लोकसेवा समोर एक दुचाकीस्वार पुण्याच्या (Pune) दिशेकडून नगरच्या (Nagar) दिशेने जात असताना त्याच वेळी पुण्याकडून (Pune) अहमदनगरच्या (Ahmednagar) दिशेने जात असलेल्या ट्रकची (Truck) दुचाकीला (Bike) जोराचा धक्का लागला व दुचाकीस्वार पाच ते दहा फुट फरपटत पडले.

ट्रकची दुचाकीला जोराची धडक; एक ठार
सुपा परिसरात मध्यम स्वरुपाचा पाऊस

त्यावेळी तेथे असलेल्या लोकसेवा हॉटेलचे मालक अमोल पवार यांनी जखमी (Injured) दुचाकीस्वाराला तात्काळ मदत करत स्वतःच्या गाडीतुन सुपा (Supa) येथील सिम्स रुग्णालयात (Sims Hospital) दाखल केले. परंतु जखमी (Injured) दुचाकीस्वाराच्या डोक्याला जबर मार व रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाल्याने सदर व्यक्ती मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

अपघाताची माहिती कळताच सुपा पोलीस (Supa Police) घटनास्थळी दाखल होऊन घडलेल्या घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तराय तपासणीसाठी पुढे पाठवण्यात आला. याबाबत गुन्हा नोंदवण्याचे काम चालू होते.

ट्रकची दुचाकीला जोराची धडक; एक ठार
पुणतांबा आंदोलक शेतकर्‍यांच्या मागण्यासाठी मंत्रालयात 7 जूनला बैठक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com