नगर-पुणे महामार्गावर तीन वाहनाचा विचित्र अपघात

चार ठार तर 10 ते 12 जण जखमी || कामरगाव शिवारात घडली घटना
नगर-पुणे महामार्गावर तीन वाहनाचा विचित्र अपघात

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

अहमदनगर-पुणे माहामार्गावर (Ahmednagar Pune Highway) गुरुवारी पहाटे सुपा कामरगाव हद्दीत दोन ट्रक व एक छोटा हत्ती वाहनांचा अपघात (Truck Tempo Accident) झाला. यात चार जण ठार (Death) झाले असुन 10 ते 12 जण जखमी (Injured) झाले आहेत.

नगर-पुणे महामार्गावर तीन वाहनाचा विचित्र अपघात
यावर्षी भरपूर पाऊस अन् शेतकर्‍यांसाठी ‘अच्छे दिन’

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, गुरुवारी पहाटे 1.30 वाजेच्या सुमारास पुणे-अहमदनगर महामार्गावर सुपा कामरगाव (Supa Kamargav) हद्दीतील हॉटेल चौधरी (ता. नगर) जवळ पुण्याकडून नगरच्या दिशेने जात असलेला ट्रक दुभाजक ओलांडून विरूध्द बाजुस गेला. त्याचवेळी नगरकडून (Ahmednagar) पुण्याच्या (Pune) दिशेने छोटा हत्ती वाहन येत होता.

नगर-पुणे महामार्गावर तीन वाहनाचा विचित्र अपघात
कोयता गँगने बोल्हेगावात दोन घरे फोडली

दुभाजक तोडलेल्या ट्रकने छोटा हत्ती वाहनाला जोराची धडक देऊन ती रोडच्या खाली नेऊन घातली. त्याच क्षणी अहमदनगरहून पुण्याच्या दिशेने जात असलेला एक कंटेनर अपघातग्रस्त ट्रकवर जाऊन धडकला. या तीन वाहनाच्या विचित्र अपघातात (Accident) छोटा हत्ती वाहनातील विजय राजेंद्र अवचिते (वय 29), राजेंद्र विष्णु साळवे (वय 38), मयुर संतोष साळवे (वय 22 रा. आमदाबाद ता.शिरूर जि. पुणे), धिरज अजय मोहिते (वय 14 रा. चिंचोली मोर ता. शिरूर जि. पुणे) हे जागीच ठार (Death) झाले. तर अन्य दहा ते बारा जण जखमी (Injured) झाले आहेत.

नगर-पुणे महामार्गावर तीन वाहनाचा विचित्र अपघात
दुध भेसळ प्रकरणात अन्न सुरक्षा अधिकारी चौकशीच्या फेर्‍यात

घटनेची माहिती कळताच सुपा पोलिस स्टेशचे (Supa Police Station) फिरते पथकातील यशवंत ठोंबरे, रमेश शिंदे यांनी तात्काळ नगर तालुका पोलिस स्टेशनला माहिती देत जखमींना रुग्णालयात दाखल केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com