टेम्पो व मोटरसायकलचा अपघात

सुपा येथील व्यावसायिकाचा मृत्यू
टेम्पो व मोटरसायकलचा अपघात

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

अहमदनगर- पुणे महामार्गावर (Ahmednagar-Pune Highway) अपघाताची मालिका (Accident) सुरूच आहे. रविवारी सुपा (Supa) येथे टेम्पो व मोटरसायकल यांच्यात अपघात (Accident News) झाला. यात सुपा (Supa) येथील हॉटेल व्यावसायिक बाळासाहेब पवार (Balasaheb Pawar) यांचा मृत्यू झाला.

याबाबत सुपा पोलिसांनी (Supa Police) दिलेल्या माहिती नुसार, रविवारी सकाळी 10 वाजेच्या दरम्यान एक मालवाहतुक टेम्पो हा सुपा नगर रोडवरील (Supa-Nagar Road) दौलत पेट्रोलपंपा समोर रस्ता ओलांडत असतांना त्याच वेळी सुपा येथील संदीप उद्योग समुहाचे सर्व्हासर्वे बाळासाहेब पवार (Balasaheb Pawar) हे पवार वाडीकडून हॉटेलवर येत असतांना टेम्पो व मोटारसायकल याची धडक (Tempo and Motorcycle Accident) झाली. यात पवार हे गंभीर जंखमी (Injured) झाले होते. त्यांना तेथील स्थानिक व्यावसायिक व रहिवाश्यांनी ताबडतोब सुपा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. परंतु परिस्थिती थोडी गंभीर वाटल्याने पवार परिवाराने त्यांना अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.

त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू असतांना सांयकाळी पाच वाजेच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली अशी माहिती सुपा पोलिसांनी दिली. बाळासाहेब पवार हे सुप्यातील हॉटेल व्यावसायिक होते. त्यांच्या जाण्याने सुपा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com